Home गुन्हे Luxury Bus Fire:निगडी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये भीषण आग; तीन लक्झरी बसेस जळून खाक

Luxury Bus Fire:निगडी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये भीषण आग; तीन लक्झरी बसेस जळून खाक

पिंपरी-चिंचवडच्या निगडी ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील लक्झरी बस पार्किंगमध्ये भीषण आग लागून तीन बसेस जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही; आगीचे कारण अस्पष्ट.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील निगडी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रान्सपोर्ट नगरमधील लक्झरी बस पार्किंगमध्ये अचानक आग लागून तीन लक्झरी बसेस पूर्णपणे जळून खाक (Luxury Bus Fire) झाल्या.

 

ही धक्कादायक घटना रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास घडली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरातील नागरिकांनी धूर आणि ज्वाळा दिसताच तत्काळ अग्निशमन दलाला माहिती (Luxury Bus Fire) दिली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी तोपर्यंत तीनही बसेस पूर्णतः जळून खाक झाल्या (Luxury Bus Fire)  होत्या.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात (Luxury Bus Fire) आहे.

घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू(Luxury Bus Fire)  आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00