महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम
पिंपरी, दि. १३ जानेवारी २०२६ :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने ‘स्वीप’ (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून शहरातील विविध ठिकाणी एअर बलूनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात (Voter Awareness Campaign)आली.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विविध स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत(Voter Awareness Campaign )आहेत.
या उपक्रमांतर्गत शहरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, भक्ती शक्ती चौक, डांगे चौक (थेरगाव), भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, रावेत येथील मुकाई चौक, पिंपळे गुरव येथील डायनॉसोर उद्यान, तळवडे चौक, चऱ्होली आदी विविध ठिकाणी एअर बलून उडवून मतदान जनजागृती करण्यात(Voter Awareness Campaign )आली.
या एअर बलूनवर मतदार जनजागृतीपर संदेश देण्यात आले असून, येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले (Voter Awareness Campaign)आहे.
“लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. एअर बलूनसारख्या नाविन्यपूर्ण माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करत असून, जास्तीत जास्त मतदारांनी १५ जानेवारी रोजी मतदानाचा हक्क (Voter Awareness Campaign)बजावावा.”
— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
“पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. एअर बलूनच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचत असून, प्रत्येक पात्र मतदाराने मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग (Voter Awareness Campaign)घ्यावा ”
— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
