Home माझं पिंपरी चिंचवड Ajit Pawar Attack,:“महेश लांडगे म्हणजे नासका आंबा” – अजित पवारांचा घणाघाती हल्लाबोल; पिंपरी-चिंचवड राजकारण तापलं

Ajit Pawar Attack,:“महेश लांडगे म्हणजे नासका आंबा” – अजित पवारांचा घणाघाती हल्लाबोल; पिंपरी-चिंचवड राजकारण तापलं

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर जहाल टीका केली. “नासका आंबा” उपमा देत भारंदाज डावाचा इशाराही दिला. वाचा सविस्तर बातमी.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण अक्षरशः उफाळून आले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेल्या जहाल टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शब्दांची धार, उपमांचा मारा आणि थेट इशारे देत अजित पवारांनी निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटवून दिला (Ajit Pawar Attack) आहे.

जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले,

“महेश लांडगे म्हणजे नासका आंबा आहे. एक नासका आंबा पूर्ण पेटी खराब करतो. वेळीच बाहेर काढला नाही, तर सगळं सडतं. १५ तारखेला मतपेटीतून हा नासका आंबा बाहेर फेकून द्या,” असे थेट आवाहन त्यांनी मतदारांना(Ajit Pawar Attack) केले.

“कार्यकर्त्यांना हात लावलात तर भारंदाज डाव टाकेन

विरोधकांकडून सुरू असलेल्या दबावतंत्रावर संताप व्यक्त करताना अजित पवारांनी आक्रमक सूर लावला.“माझं नाणं खणखणीत आहे, माझं काम बोलतं. कुणी माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा — मी खेळातील डावपेच चांगले जाणतो. असा भारंदाज डाव टाकेन की फिरवून फिरवून फेकून देईन आणि पुन्हा डोकं वर काढायला जागा उरणार नाही,” असा इशाराही त्यांनी(Ajit Pawar Attack) दिला.

भ्रष्टाचारावर जोरदार प्रहार

पवारांनी गेल्या नऊ वर्षांतील महापालिकेच्या कारभारावरही गंभीर आरोप केले.“९ हजार कोटींचं बजेट असताना महापालिकेवर कर्ज काढण्याची वेळ का आली? टँकर माफिया, भंगारवाले आणि दलालांच्या हातात शहराचं भवितव्य दिलं गेलं आहे. ज्यांना शहराचं व्हिजनच नाही, अशांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ (Ajit Pawar Attack) डागली.

निवडणूक प्रचाराला आक्रमक वळण

अजित पवारांच्या या आक्रमक भाषणानंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निवडणूक प्रचाराला आता स्पष्टपणे संघर्षाचे वळण लागले आहे. येत्या काही दिवसांत हे वाकयुद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात (Ajit Pawar Attack) आहे.

https://youtube.com/watch?v=JoLaGASQwK8&si=IbSFWbgz4_CfKZCg


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00