Home माझं पिंपरी चिंचवड Thergaon ward 24:थेरगाव प्रभाग २४ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी युतीला स्पष्ट आघाडी

Thergaon ward 24:थेरगाव प्रभाग २४ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी युतीला स्पष्ट आघाडी

by Admin
Spread the love

थेरगाव:थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी प्रचाराचे वातावरण धगधगत आहे. या प्रभागात शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या पॅनलला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. अधिकृत उमेदवार विश्वजीत बारणे, निलेश बारणे, मायाताई बारणे आणि रूपालीताई गुजर यांचे स्वागत फुलांची उधळण, रंगीबेरंगी रांगोळ्या, औक्षण तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आले, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभागातील प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, “धनुष्यबाण–घड्याळ–रिक्शा” या घोषणांनी संपूर्ण प्रभाग गजरून गेला आहे. उमेदवारांच्या पदयात्रा, रॅलींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांसह युवकांचा सहभागही लक्षणीय आहे. युतीने प्रभागातील स्थानिक समस्या, विकासकामांचा आढावा तसेच भविष्यातील योजनांबाबत मतदारांशी थेट संवाद साधण्यात यश मिळवले आहे.

उमेदवारांनी शिव कॉलनी, दुर्गा कॉलनी, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी, स्वप्नपुष्प कॉलनी, आदर्श कॉलनी, कन्हैया पार्क, लेन वन–टू–थ्री, साई पार्क आदी भागांतून पदयात्रा काढल्या, ज्यामुळे संपूर्ण प्रभाग अक्षरशः गाजला. विशेषतः कन्हैया पार्क येथील कोपरा सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे जनतेचा युतीच्या उमेदवारांकडे स्पष्ट कौल दर्शवणारा महत्त्वाचा संकेत ठरला आहे.

एकूणच, शिस्तबद्ध प्रचार, ठोस विकासाचा अजेंडा, मजबूत नेतृत्व आणि जनतेशी थेट जोडलेला संवाद यामुळे शिवसेना–राष्ट्रवादी युतीने प्रभाग क्रमांक २४ मध्ये स्पष्ट आघाडी घेतली आहे. “विकास, स्थैर्य आणि लोकहित” या त्रिसूत्रीवर चालणारा हा प्रचार आता विजयाकडे वेगाने झुकत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00