Home प्रेरणा / यशकथा Rss Ideology:प्रश्न विचारणे हे विचारशीलतेचे लक्षण – सुहास हिरेमठ

Rss Ideology:प्रश्न विचारणे हे विचारशीलतेचे लक्षण – सुहास हिरेमठ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे’ पुस्तकाचे प्रकाशन

by Admin
Spread the love

सुहास हिरेमठ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वेदकाळापासून भारतीय संस्कृतीत प्रश्नोत्तरांची समृद्ध परंपरा आहे. संघस्थापनेपासून संघावर अनेक प्रश्न विचारले गेले असून, संघाने कधीही प्रश्नांना नकार न देता समर्पक उत्तरे दिली आहेत. संघ समजून घेण्यासाठी तो प्रत्यक्ष अनुभवावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. गांधीहत्येनंतर संघावर झालेल्या तीव्र विरोधाचा उल्लेख करीत, निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांच्या बळावर संघ आजही भक्कमपणे उभा असल्याचे त्यांनी नमूद (Rss Ideology)केले.

एस. एन. बी. पी. शिक्षणसंस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दशरथ गोखले यांनी आपल्या अनुभवांतून संघ ही माणूस घडवणारी विचारांची शाळा असल्याची भावना व्यक्त केली. लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी पुस्तकात संघाविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या सुमारे ६२ प्रश्नांची सविस्तर उत्तरे समाविष्ट केल्याची माहिती(Rss Ideology) दिली.

कार्यक्रमास संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, भारतीय विचार साधनाचे कार्यवाह काशिनाथ देवधर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित(Rss Ideology) होते.

सरस्वती व अखंड भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संपदा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीराम काळे यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात(Rss Ideology) आली.

https://youtube.com/watch?v=R_kDm–wYkM&si=fyUqhydLw6eiYeMF


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00