Home राजकारण BJP Padyatra:प्राधिकरणात भाजप उमेदवारांची जोशपूर्ण पदयात्रा

BJP Padyatra:प्राधिकरणात भाजप उमेदवारांची जोशपूर्ण पदयात्रा

प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप उमेदवार अमित गावडे, शैलजाताई मोरे, राजू मिसाळ व शर्मिलाताई बाबर यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. घरोघरी भेटी देत प्रचार व विकासाचे आश्वासन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :प्रभाग क्रमांक १५, प्राधिकरण परिसरात भाजपच्या उमेदवारांची भव्य पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भाजपचे उमेदवार अमित गावडे, शैलजाताई मोरे, राजू मिसाळ आणि शर्मिलाताई बाबर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काच घर चौक येथून सुरू( BJP Padyatra) झाली.

सेक्टर क्रमांक २४ मधील विविध भागांत उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला आणि प्रचार केला. या पदयात्रेत पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जोशात सहभागी झाले(BJP Padyatra )होते.

हातात उमेदवारांचे मुखवटे, भाजपचे झेंडे आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांनीही पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले.

दरम्यान, सकाळी शैलजाताई मोरे यांनी एलआयजी कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. मतदारांच्या समस्या जाणून घेत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासनBJP Padyatra )दिले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00