Home प्रेरणा / यशकथा Devendra Fadnavis:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शक्तिस्थळ’चे लोकार्पण | लक्ष्मणभाऊ जगताप स्मृतीस्थळ

Devendra Fadnavis:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शक्तिस्थळ’चे लोकार्पण | लक्ष्मणभाऊ जगताप स्मृतीस्थळ

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना समर्पित ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणास्थळाचे लोकार्पण १ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी येथे संपन्न होणार आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी  : प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेले लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणादायी स्मारकाचे लोकार्पण गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. पिंपळे गुरव गावठाण येथील मारुती मंदिराजवळ हा भव्य सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार (Devendra Fadnavis) आहे.

लोकसेवेचा समृद्ध वारसा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारे ‘शक्तिस्थळ’ हे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याची चिरंतन आठवण जपणारे केंद्र ठरणार आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय तसेच जनहिताच्या कार्यातून समाजाला मिळालेली दिशा आणि प्रेरणा या शक्तिस्थळातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात येणार (Devendra Fadnavis)आहे.

या लोकार्पण सोहळ्याला आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार, कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या या शक्तिस्थळाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले(Devendra Fadnavis)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00