Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Election 2026 :पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५–२६ | नामनिर्देशन प्रक्रिया २३ डिसेंबरपासून

PCMC Election 2026 :पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५–२६ | नामनिर्देशन प्रक्रिया २३ डिसेंबरपासून

उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर ( PCMC Election 2026) यांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन पद्धतीने दि. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करता येणार आहेत. अंतिम दिवशी उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर ( PCMC Election 2026) करता येतील.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात  ( PCMC Election 2026)आल्या आहेत.

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार असून उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम तारीख दि. २ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी दि. ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली ( PCMC Election 2026)जाणार आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.नामनिर्देशन पत्रांची छाननी, वैधता तपासणी, उमेदवारी माघारी घेणे तसेच अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याचे सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले  ( PCMC Election 2026)आहे.

तसेच, नामनिर्देशन पत्रे दाखल करताना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे व अनिवार्य शुल्क वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित नामनिर्देशन बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले  ( PCMC Election 2026)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00