पिंपरी, दि. १७ डिसेंबर २०२५ :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हार्डीकर यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट (Shravan Hardikar) केले.
महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून शहरात एकूण ३२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जाणार असून एकूण १२८ सदस्यांची निवड होणार आहे. यामध्ये ५० टक्के म्हणजेच ६४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीही नियमानुसार आरक्षण निश्चित करण्यात (Shravan Hardikar)आले आहे.
महापालिका क्षेत्रातील एकूण मतदारसंख्या सुमारे १७ लाखांहून अधिक असून, त्यामध्ये पुरुष, महिला तसेच इतर मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांसाठी २ हजार ३४ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू असल्याचे हार्डीकर यांनी(Shravan Hardikar) सांगितले.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून कामकाज सुरू असून, ८ निवडणूक निर्णय अधिकारी व २४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुमारे १४ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी(Shravan Hardikar) असतील.
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून, पोलिस प्रशासन, महापालिका व निवडणूक यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. प्रचार फेरी, सभा, खर्च, बेकायदा वाहतूक व पैशांच्या वापरावर करडी नजर ठेवली जाणार आहे. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहितीही आयुक्त हार्डीकर यांनी(Shravan Hardikar) दिली.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने SVEEP (मतदान जनजागृती) अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात असून तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात (Shravan Hardikar)आहे.
मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी mahasecvoterlist.in या अधिकृत संकेतस्थळावर ‘Search Name in Voter List’ ही सुविधा उपलब्ध असल्याचेही(Shravan Hardikar) त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हार्डीकर यांनी केले (Shravan Hardikar)आहे.
