Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Election NCP:शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, भाजपच्या अश्विनी जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

PCMC Election NCP:शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, भाजपच्या अश्विनी जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद वाढवली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे व इतरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

by Admin
Spread the love

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडचा आपला जुना बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली असून, मंगळवारी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका रुपाली आल्हाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर(PCMC Election NCP) प्रवेश केला.

 

पिंपरी-चिंचवड शहर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि विशेषतः अजित पवार यांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचा अपराजित गड म्हणून या शहराकडे पाहिले जायचे. मात्र २०१७ साली भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी या राजकीय किल्ल्यावर जोरदार धडक देत महापालिकेत प्रथमच भाजपचे कमळ फुलवले. त्यानंतर शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडत गेले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आणि सध्या दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत सहभागी (PCMC Election NCP)आहेत.

 

आता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर, अजित पवार यांनी आपल्या पूर्वीच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली वेगवान(PCMC Election NCP) केल्या आहेत.

 

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची पुण्यात स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत शहराच्या राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका रुपाली आल्हाट तसेच चिखली येथील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रबळ उमेदवार साधना काशीद यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश(PCMC Election NCP )देण्यात आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00