शनिवार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर, तसेच सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्या उपस्थितीत होणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे आणि बापूसाहेब पठारे हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी) चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान (देहू) चे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांचीही उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. देवराज डहाळे, तसेच माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे व अश्विनी चिंचवडे उपस्थित(Morya Gosavi Mahotsav) होते.
यापुढे दर संकष्टी चतुर्थीला पवनामाईची आरती सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण व नदी संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात(Morya Gosavi Mahotsav) येत आहे.
उद्घाटनापूर्वी नितीन दैठणकर यांच्या सनईवादनाने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. पाचही दिवस सकाळी ६ वाजता सनई–चौघडा वादन आणि सकाळी ८.३० वाजता श्री मोरया गोसावी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र पठण होईल.
सोहळ्यातील प्रमुख धार्मिक विधींमध्ये रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी ९ ते ११ या वेळेत सामुदायिक महाभिषेक आणि वैदिक पद्धतीने संपन्न होणारे मन्युसुक्त हवन यांचा (Morya Gosavi Mahotsav)समावेश आहे.
सोहळ्यादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आले आहे. ७ आणि ८ डिसेंबर रोजी आरोग्य, दंत व नेत्र तपासणी शिबिरे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी सकाळी ‘सोहम योग साधना मंडळा’तर्फे योग वर्ग (Morya Gosavi Mahotsav)आयोजित केला आहे.
रात्रीच्या सांस्कृतिक सत्रात कला, साहित्य आणि संगीताची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. योगिता गोडबोले आणि संदीप उबाळे यांचे सुगम संगीत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा ‘मर्मबंधनातली ठेव’ कार्यक्रम, तसेच पं. भुवनेश कुमार कोमकली यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे. सोमवार, ८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. संकर्षण–स्पृहा यांचे विशेष सादरीकरण आणि योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ कार्यक्रमही यंदा विशेष लक्षवेधी ठरणार (Morya Gosavi Mahotsav)आहे.
सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला ‘महासाधू श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी डॉ. प्रमोद चौधरी यांना ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान केला जाणार (Morya Gosavi Mahotsav)आहे.
बुधवार, १० डिसेंबर (मार्गशीर्ष वद्य षष्ठी) रोजी सोहळ्याची सांगता होईल. पहाटे ४.३० वाजता श्रींच्या संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते पार पडेल. सकाळी ७ वाजता पुष्पवृष्टी, नगारखाना आणि केरळी वाद्य पथकासह नगरप्रदक्षिणा निघेल. त्यानंतर सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजल्यापासून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मानवंदना ढोलताशा पथक, गंगा आरती आणि रात्री ८ वाजता भव्य आतषबाजीसह सोहळ्याची (Morya Gosavi Mahotsav)सांगता करण्यात येणार आहे.
सर्व मोरया भक्तांनी या सोहळ्यास तन–मन–धनाने सहकार्य करून श्री मोरया चरणी सेवा रुजू करावी आणि हा भक्तिसोहळा अधिक यशस्वी करावा, असे आवाहन मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज, तसेच विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप आणि ॲड. देवराज डहाळे (Morya Gosavi Mahotsav)यांनी केले आहे.
