Home गुन्हे Pune Police:पुणे पोलिसांची धडक कारवाई: अपहरण प्रकरणातील ৫ आरोपी ताब्यात

Pune Police:पुणे पोलिसांची धडक कारवाई: अपहरण प्रकरणातील ৫ आरोपी ताब्यात

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अपहरण आणि मारहाण प्रकरणातील ৩ आरोपी व ২ बालकांना केवळ ১২ तासांत ताब्यात घेतले. चोरीचा मुद्देमालही जप्त.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा, युनिट ३ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण आणि गंभीर दुखापत प्रकरणातील ३ मुख्य आरोपी तसेच गुन्ह्यात सहभागी २ बालकांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारजणांना मारहाण करून त्यापैकी दोघांचे अपहरण करण्यात आले होते, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा युद्धपातळीवर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढून त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात (Pune Police)  आले.

 

या प्रकरणात सुदर्शन महादेव आडे यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या मित्रांपैकी विकास अर्जन सोनकांबळे आणि संतोष भाऊसाहेब हांबर्डे यांचे अपहरण करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी देहूफाटा परिसरातून मुख्य संशयित सुबोध मल्हारी कांबळे (वय २०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार भोसरी परिसरातून ओंकार संजय कांबळे (वय १८), सुरज महादेव शिंदे (वय १९) आणि गुन्ह्यात सहभागी असलेली २ बालके यांनाही(Pune Police) ताब्यात घेण्यात आले.

 

चौकशीत आरोपींनी रस्ता विचारण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा गंभीर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी फिर्यादी सुदर्शन आडे आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करून त्यांच्याकडून पाचशे रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन हिसकावले. त्यानंतर विकास सोनकांबळे आणि संतोष हांबर्डे यांना ‘छोटा हत्ती’ टेम्पोमध्ये जबरदस्ती बसवून आळंदी ते चाकण मार्गावरील जंगल भागात नेले आणि तेथे पुन्हा मारहाण करून(Pune Police) त्यांना सोडून दिले.

 

पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गंभीर गुन्हा पोलीस उप-आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने(Pune Police) अल्पावधीत उघडकीस आणला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00