Home माझं पिंपरी चिंचवड Voter List Objections:पिंपरी–चिंचवड मतदार यादीतील त्रुटींवर भाजपचे निवेदन | 2025

Voter List Objections:पिंपरी–चिंचवड मतदार यादीतील त्रुटींवर भाजपचे निवेदन | 2025

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025 साठीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025 साठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावरील त्रुटी, विसंगती आणि नागरिकांकडून वाढत्या तक्रारींचा गंभीर पद्धतीने घेत पिंपरी–चिंचवड भाजपने आज राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन सादर केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संपूर्ण शहराच्या वतीने हे निवेदन देत, मतदार यादीतील सर्व गोंधळ तात्काळ दूर करण्याची मागणी (Voter List Objections) केली.

निवेदनात काटे यांनी नमूद केले की, प्रारूप यादीमध्ये अनेक मतदारांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतर होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील चुका तसेच यादी पाहण्यासाठी प्रभावी डिजिटल सुविधा नसणे—या सर्व कारणांमुळे शहरात मोठा संभ्रम (Voter List Objections) निर्माण झाला आहे.

“मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा गंभीर त्रुटींवर तातडीने कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही त्यांनी निदर्शनास आणून (Voter List Objections) दिले.

याच अनुषंगाने, नागरिकांना योग्य संधी मिळावी म्हणून हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत किमान 10 दिवसांनी वाढवावी, अशी मागणी काटे यांनी आयोगाकडे केली आहे. तसेच पिंपरी–चिंचवडमधील नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून विशेष हेल्पडेस्क, ऑनलाइन शोध सुविधा आणि सहाय्य केंद्र तत्काळ सुरू करण्याचीही विनंती करण्यात (Voter List Objections) आली.

“अचूक मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेची भक्कम पायाभरणी असते. चुकीची, अपूर्ण किंवा गोंधळाची यादी नागरिकांशी अन्याय करणारी ठरते. त्यामुळे पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने तातडीने पावले उचलली पाहिजेत,” असे शहराध्यक्षांनी (Voter List Objections) स्पष्ट केले.

शहरातील विविध भागांतून येणाऱ्या असंख्य तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन महत्त्वाचे ठरत असून आगामी निवडणूक प्रक्रियेच्या शुचिते आणि विश्वासार्हतेबाबत आयोगाची भूमिका कोणती असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले  (Voter List Objections) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00