प्रतिनिधी:निवडणूक आयोगाने प्रभागात जाऊन मतदार याद्या तयार करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाला असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरेखे यांनी केला आहे.
अशा कामकाजामुळे विरोधक वेळोवेळी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात का, असा प्रश्न विचारला असता गोरेखे म्हणाले की, “निवडणूक आयोगाने तंतोतंत आणि काटेकोरपणे काम करणे आवश्यक आहे.” आता आयोगाकडे वेळ कमी असल्याने, त्यांनी शक्य तितक्या लवकर या त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
यापूर्वी महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षानेही निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यात आता भाजपकडूनही अशी नाराजी व्यक्त झाल्याने, निवडणूक आयोग या सर्व तक्रारी कोणत्या पद्धतीने सोडवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
