निगडी प्राधिकरण : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आणि खेलो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित के–टू–के (K2K) म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी या भव्य सायकल मोहिमेत व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अमोल दिघे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले (K2K Cycling) आहे.
या मोहिमेसाठी देशभरातून आलेल्या हजारो अर्जांमधून फक्त १५० सायकलपटूंची निवड करण्यात आली होती. त्यापैकी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ जणांपैकी अमोल दिघे हे एक होते. १ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सहभागी सायकलपटूंनी जवळपास ४,००० किमी अंतर पार (K2K Cycling) केले.
कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, जोरदार वारे, अवघड डोंगररांगा, प्रखर उन्हाळा अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करताना टायर खराब होणे, ट्यूब फुटणे, चाके व बेअरींग निकामी होणे यांसारख्या अनेक तांत्रिक अडचणींना देखील सामोरे जावे लागले. या सर्व अडथळ्यांवर मात करत १६ दिवस सलग दररोज २५० ते ३०० किमी सायकल चालवणे हे सामान्यांच्या पलीकडचे धाडस असून प्रचंड इच्छाशक्ती व शिस्तीचे (K2K Cycling) प्रत्यंतर आहे.
देशभरातील निवडक १५० सायकलपटूंमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल अमोल दिघे यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय पराक्रमाबद्दल आज प्रभु श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, यमुनानगर, निगडी पुणे आणि जेष्ठ नागरिक संघ, यमुनानगर यांच्या वतीने अध्यक्ष गजानन ढमाले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार (K2K Cycling) करण्यात आला.
