शिष्टाचाराप्रमाणे, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. निवडणूक काळात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे, पक्षाचा जाहीरनामा तयार करणे, समाजातील विविध घटकांशी संवाद साधणे, इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करणे आणि प्रचारयंत्रणा उभारणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ( Pcmc BJP Election Committee )या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.
समितीमध्ये विविध कार्यक्षेत्रांसाठी खालीलप्रमाणे प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे :
जाहीरनामा प्रमुख : अमोल देशपांडे
महा-युती मित्रपक्ष समन्वयक : सदाशिव खाडे
प्रचार यंत्रणा समन्वयक : विजय फुगे
निवडणूक आयोग संपर्क प्रमुख : राजेश पिल्ले
विरोधकांसाठी आरोपपत्र प्रमुख : विलास मडीगेरी
विशेष संपर्क प्रमुख : संजय मंगोडेकर
याशिवाय, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाडे, मधुकर बच्चे, सुजाता पालांडे, दिनेश यादव, कुणाल लांडगे, माऊली थोरात, राजू दुर्गे, सत्यनारायण चांडक, संजय परळीकर, गोपाळ माळेकर, गोरक्षनाथ झोळ, राजू मासुळकर, गुलाब बनकर, अजित भालेराव, मनोज ब्राह्मणकर, अजित कुलथे, अभिजीत बोरसे, दीपक नागरगोजे, अमेय देशपांडे, सचिन राऊत, सागर फुगे, समीर जावळकर, कैलास सानप आणि भूषण जोशी या पदाधिकाऱ्यांनाही विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या (Pcmc BJP Election Committee )आहेत.
समिती जाहीर करण्यापूर्वी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे आणि माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्याशी चर्चा करून समतोल राखत ही घोषणा केल्याचे शहर प्रवक्ते कुणाल लांडगे ( Pcmc BJP Election Committee) यांनी सांगितले
