Home पुणे Alandi Election2025:आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नामनिर्देशनांचा वाढता वेग; आज 67 अर्ज दाखल

Alandi Election2025:आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नामनिर्देशनांचा वाढता वेग; आज 67 अर्ज दाखल

by Admin
Spread the love

आळंदी : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय  (Alandi Election-2025) अधिकारी यांच्याकडे सुरू आहे.

आज 16 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत एकूण 67 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. यापैकी नगराध्यक्ष पदासाठी 2 तर सदस्य पदासाठी 65 अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे आज दाखल झालेल्या( Alandi Election-2025)नामनिर्देशनांची संख्या 67 इतकी नोंदली गेली.

काही उमेदवारांनी एक किंवा दोन पक्षांकडून तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केले आहेत. उद्या 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्याआधीच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची (Alandi Election-2025)मोठी गर्दी दिवसभर नगरपरिषद परिसरात पाहायला मिळाली.

आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेला वाढत चाललेला प्रतिसाद आणि वाढती राजकीय हालचाल यामुळे (Alandi Election-2025) आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले



Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00