74
पिंपरी (१६ नोव्हेंबर २०२५) : “बंकिमचंद्र चटोपाध्याय हे भारतीय राष्ट्रीय विचारप्रवाहाचे मूळ प्रेरणास्थान आहेत. ‘वंदे मातरम्’ या गीताने त्यांनी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची तेजस्वी ज्योत चेतवली!” असे प्रतिपादन अभ्यासक नारायण देशपांडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त (Vande Mataram-150)
आयोजित ‘वंदे मातरम् – राष्ट्रचेतना स्तोत्र’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
