प्रतिनिधी :पिंपरी चिंचवडच्या ‘इको पेडलर ’ सायकल वीरांनी 26/11 शहीदांना अभिवादन करण्यासाठी एक अनोखी आणि प्रेरणादायी सायकल मोहीम पार पाडली. पंढरपूर, गोवा अशा कठीण मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या ग्रुपने आपल्या चौथ्या वर्षी देशभक्तीचा सुंदर संदेश देणारा( Eco Pedalers-150km)उपक्रम राबवला.
माझं पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी :म्हाळुंगे इंगळे परिसरात हॉटेल चालकाला धमकावून ४५ हजारांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सर्वांना अटक केली आहे. ही घटना १९ नोव्हेंबर (Extortion Arrest )रोजी घडली.
अटक केलेल्या आरोपींची नावे भारत ओव्हाळ, पांडुरंग साळुंखे, कल्पेश खैरनार, कृष्णा काळे आणि किरण लोखंडे अशी (Extortion Arrest) आहेत.
या प्रकरणी अलिशेर अली (वय २५, रा. महाळुंगे इंगळे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांचे महाळुंगे इंगळे येथे स्वतःचे हॉटेल (Extortion Arrest) आहे.
घटनेदिवशी सर्व आरोपी हॉटेलमध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी शटर खाली ओढून ग्राहकांना बाहेर काढले आणि फिर्यादीला धमकावत “जेलमध्ये टाकू” अशी भीती दाखवली. यावेळी पांडुरंग साळुंखे यांनी स्वतःला क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवत दोन लाख रुपयांची खंडणी (Extortion Arrest) मागितली.
दडपशाही करून फिर्यादीकडून एटीएममधून ४५ हजार रुपये काढून घेतले. नंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा शाखेने तत्पर कारवाई करत सर्व आरोपींना(Extortion Arrest) बेड्या ठोकल्या.
या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी(Extortion Arrest) पोलिसांकडून सुरू आहे.
Pune Traffic News:कात्रज बायपास नवीन वेगमर्यादा लागू | नवले पुलाजवळ अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय |
प्रतिनिधी:कात्रज बायपासवरील नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने अखेर कठोर निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबर (मंगळवार) पासून या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा लागू करण्यात येणार ( Pune Traffic News) आहे.
अलिकडेच नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेने नागरिक आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर वाहतूक विभागाने अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय ( Pune Traffic News) घेतला.
पुणे–मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कात्रज बायपास मार्गावर भुमकर ब्रिज ते नवले ब्रिजच्या शेवटपर्यंत संपूर्ण पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा 30 किमी प्रतितास इतकी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त नवले पुलाच्या तीव्र उतारापुरती होती. मात्र सततचे अपघात, वाहनांची गर्दी आणि धोकादायक उतार लक्षात घेऊन आता पूर्ण मार्गावर ही नवी मर्यादा लागू करण्यात ( Pune Traffic News) आली आहे.
वाहतूक विभागाच्या मते, नवीन वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास कात्रज बायपासवरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास ( Pune Traffic News) मदत होईल.
Madhukar Pavale Tribute:पिंपरी चिंचवड महापालिकेत माजी महापौर मधुकर पवळे यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी:पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्मृतिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात (Madhukar Pavale Tribute) आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी मुख्य प्रशासकीय अधिकारी मकरंद निकम, माजी नगरसदस्या सुमन पवळे, शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पवळे कुटुंबीय उपस्थित )Madhukar Pavale Tribute )होते.
याच निमित्ताने निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील मधुकर पवळे यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त व क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, पंकज बगाडे, राजाराम राऊत, पवळे कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिक ( Madhukar Pavale Tribute)उपस्थित होते.
महापालिकेने या निमित्ताने माजी महापौर मधुकर पवळे यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण (Madhukar Pavale Tribute ) केली.
Final Rites:बॉलिवूडचा ही-मॅन धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास – विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार
मुंबई,:हिदी चित्रपटसृष्टीतील अजरामर सुपरस्टार, लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि “ही-मॅन” म्हणून विशेष ओळखले जाणारे धर्मेंद्रसिंग देओल यांचे आज वयाच्या ८९व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्य समस्यांशी झुंज देत होते. काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी हलवण्यात आले होते; मात्र अखेर त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास ( Final Rites)घेतला.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. चाहत्यांसाठी ही एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी ठरली आहे. त्यांचे विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आज दुपारी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी देओल परिवारासोबत अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीतील जिवलग मंडळींनी हजेरी लावून अंतिम श्रद्धांजली( Final Rites) वाहिली.
सहा दशकांचा अविस्मरणीय प्रवास
1960 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवले. शोले मधील वीरू, चुपके चुपके मधील विनोदी अभिनय, धरम वीर, सीता और गीता, शराबी, यादों की बारातसारख्या असंख्य चित्रपटांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स — कोणत्याही शैलीमध्ये सहज रुळणारा अभिनेता म्हणून त्यांची( Final Rites) ख्याती होती.
त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना “ही-मॅन ऑफ बॉलिवूड” ही उपाधी मिळाली. स्टंट स्वतः करण्याची धडाडी, संवादफेक, व्यक्तिमत्त्व आणि स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ते 70–80 च्या दशकातील सर्वात मोठे सुपरस्टार ठरले. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पद्मभूषण सन्मानही प्रदान करण्यात( Final Rites) आला होता.
कुटुंबीयांची भावनिक प्रतिक्रिया
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी हेमा मालिनी, मुलगे सनी देओल, बॉबी देओल, तर मुली ईशा आणि अहाना देओल यांनी त्यांच्या जाण्याला “कधीही न भरून येणारी पोकळी” असे संबोधले आहे. देओल कुटुंबाचे अनेक नातेवाईक आणि जवळचे मित्र दिवसभर त्यांच्या निवासस्थानी ( Final Rites)दाखल होत होते.
चाहत्यांचा आवडता ‘माणूस’
चाहत्यांनी धर्मेंद्र यांना फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर “माणूस” म्हणूनही जपले. त्यांचा साधेपणा, नम्रता, ग्रामीण मातीचा सुगंध असलेले व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना जोडून घेण्याची प्रवृत्ती यामुळे ते आजही लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवून आहेत. सोशल मीडियावर देशभरातून शोकसंदेशांचा महापूर उसळला असून “एक युग संपले” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला ( Final Rites)मिळतात.
भारतीय सिनेमाचे एक सुवर्णपान संपले
धर्मेंद्र यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भव्य, सुवर्ण कालखंड संपल्याची भावना बॉलिवूडमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूमुळे भारतीय सिनेमा एका महान कलाकाराला मुकला आहे. त्यांच्या भूमिका, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि सिनेमातील अमर योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ( Final Rites) राहील.
Amit Gorkhe BJP:पिंपरी चिंचवड भाजप निवडणूक तयारीला वेग; जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर – समिती संयोजकपदी आमदार अमित गोरखे
पिंपरी, ता. २३ – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत राबविण्यासाठी पक्षाच्या वतीने जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, वॉर्डनिहाय रणनीती तयार करणे, प्रचारयंत्रणा कार्यान्वित करणे तसेच विविध विभागांतील समन्वय साधणे या सर्व जबाबदाऱ्यांसाठी ही (Amit Gorkhe BJP) समिती काम पाहणार आहे.
- प्रदेश भाजपने या महत्त्वाच्या समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमता, व्यापक संघटन कौशल्य व पिंपरी चिंचवडच्या राजकीय परिस्थितीवरील चांगल्या जाणिवेचे मूल्यांकन करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांसह महायुतीच्या सहयोगी पक्षांकडूनही स्वागत करण्यात (Amit Gorkhe BJP) येत आहे.
समितीत विविध महत्त्वाच्या पदांसाठी जबाबदाऱ्या जाहीर करण्यात आल्या असून त्यात खालील प्रमुख विभागांचा समावेश आहे:
जाहीरनामा प्रमुख
महाल्युती मित्र पक्ष समन्वयक
प्रचार यंत्रणा समन्वयक
निवडणूक आयोग संपर्क प्रमुख
उमेदवार संभाषण व तपासणी समिती
शिस्तभंग व तक्रार निवारण प्रमुख
रोधकांसाठी आरोपपत्र प्रमुख
सामाजिक संपर्क प्रमुख
विशेष संपर्क विभाग
मतदार संवाद आणि बूथ व्यवस्थापन प्रमुख
IT व सोशल मीडिया प्रचार प्रमुख
भाजपने यावेळी तंत्रज्ञानाधारित प्रचार, घराघरात पोहोच, बूथ मजबुतीकरण आणि स्थानिक मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची रणनीती आखली आहे. वॉर्डनिहाय सर्वेक्षण, मतदार डेटा विश्लेषण आणि सर्वच उमेदवारांसाठी विजयी आराखडा तयार करण्याचे काम समितीमार्फत होणार (Amit Gorkhe BJP)आहे.
आगामी निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा मिळवण्यासाठी भाजप पूर्ण तयारीने मैदानात उतरल्याचे या समितीच्या जाहीरातीतून (Amit Gorkhe BJP) स्पष्ट झाले आहे
पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काळेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी कारवाई करत १९ वर्षीय तरुणाला भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत अटक( Kalewadi Arms Act Case)
करण्यात आली आहे.
पथकाने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपी रोहन बाबासाहेब गायकवाड याला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला (Kalewadi Arms Act Case)
आहे.
पिंपरी प्रतिनिधी
भोसरी एमआयडीसीतील ज्योती सोल्यूशन वर्क्स कंपनीतील तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष गणपत नलवडे (रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. कंपनीचे साहित्य घेऊन गेलेल्या नलवडे यांनी ते परत न केल्याने कंपनीचे नुकसान झाल्याची फिर्याद अमोल अशोक स्वामी यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक आणि अपहारासंबंधी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
—
मोशीतील चाकू हल्ला; भांडण सोडविण्यास गेलेल्या दोघा भावांना गंभीर जखमी
पिंपरी –मोशीतील वरस्ता परिसरात शनिवारी (दि. २२) सकाळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर चाकूने हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजू छोटक बिंड (रा. जाधववाडी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जुनाकुमार हरिषसिंग यादव (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) याला अटक केली.
मनोजकुमार विंड आणि आरोपी यादव यांच्यातील वाद सोडवण्यासाठी राजू बिंड मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केला. राजू यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ गिरेंद्र विंड गेले असता आरोपीने त्यांच्यावरही वार केला. पुढील तपास सुरू आहे.
पिंपरी प्रतिनिधी :मुळशी तालुक्यातील लवळे फाटा परिसरात शनिवारी (दि. २२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. वैभव मालपोटे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव(Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव मालपोटे आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोराची धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा (Crime News)मृत्यू झाला.
या प्रकरणी वैभव यांचे नातेवाईक गोविंद बाबूराव मालपोटे (रा. कातरखडक, ता. मुळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डंपर चालक बाबाराव सोनबा पवार (वय ३६, रा. उरवडे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Crime News)आला आहे.
पोलिसांनी पुढील तपास (Crime News) सुरू केला आहे.
प्रतिनिधी :इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या उपक्रमाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. वारकरी परंपरेची वात्सल्यपूर्ण परंपरा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम यामध्ये अनुभवायला मिळाला. विशेषतः ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा कार्यक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. शिवकालीन शौर्य, सांस्कृतिक वारसा आणि नदी संरक्षणाचा संदेश यांची प्रभावी जोड या (River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड सायक्लोथॉनमध्ये पाहायला मिळाली.
रविवार, 23 नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक’ परिसरातून सायक्लोथॉनची सुरुवात झाली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सलग नऊ वर्षे आयोजित होत असलेल्या या उपक्रमाने यंदा नवा विक्रम नोंदवला. रणमर्द शिलेदारांचे संचलन, मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा दणदणाट आणि मशाल-दिवटीच्या नृत्यरचना यामुळे शिवराज्यकालीन वातावरणाची जिवंत झलक अनुभवायला मिळाली. शिव(River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड शंभू गर्जनेने परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, धनश्री हॉस्पिटलचे संचालक तसेच अनेक संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ( River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड
उपक्रम पार पडला.
जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ छत्रपती संभाजी महाराजांना नमन करण्यासाठी हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. ‘शिव-शंभू यशोगाथा’ हे या वर्षीचे मुख्य आकर्षण ठरले.
एआय काउंटिंग सिस्टममुळे मिळाले विक्रमी आकडे
सायक्लोथॉनसाठी 38 हजार सायकलपटूंनी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, WTE फाउंडेशनने वापरलेल्या एआय काउंटिंग सिस्टममुळे प्रत्यक्ष उपस्थितीचे आकडे आणखीनच मोठे ठरले. संगणक दृष्टी आणि डीप लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित अहवालानुसार 51 हजार 300 पेक्षा अधिक सायकली आणि जवळपास 78 हजार 900 नागरिक उपस्थित होते. नोंदणीपेक्षा अनेक पटीने अधिक लोकांनी सहभाग घेतला, ही बाब विशेष ठरली.
आयोजनात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिस विभाग, शासकीय यंत्रणा, शाळा-महाविद्यालयांनी मिळून हा उपक्रम यशस्वी केला, अशी भावना मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी व्यक्त (River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड केली.
तीन ट्रॅक आणि हजारोंचा उत्साह
या सायक्लोथॉनमध्ये 5, 15 आणि 25 किमी अशा तीन वेगवेगळ्या ट्रॅकवर हजारोंनी सहभाग नोंदवला.
अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, ‘शिव-शंभू यशोगाथा ही केवळ सांस्कृतिक सादरीकरणांची मालिका नसून इतिहास-संस्कृती जपण्याची प्रेरणा आहे. हीच प्रेरणा पर्यावरणसंवर्धनात अधिकाधिक (River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड
लोकांना सामील करेल.’
आमदार महेश लांडगे म्हणाले की,
इंद्रायणी ही आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहे. तिच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला दिलेली मान्यता हा या उपक्रमाचा मोठा विजय आहे. जवळपास 79 हजार नागरिकांच्या सहभागामुळे नदीसंवर्धनाचा लढा अधिक सक्षम होईल. यंदाची सायक्लोथॉन स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणला समर्पित करण्यात आली असून हजारो सायकलपटूंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला (River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड
अभिवादन केले.
ते पुढे म्हणाले की, स्मारक उभारणीच्या काळात अनेक आरोप झाले, अडचणी आल्या; परंतु पुढील काळात कोणताही खोटा आरोप सहन केला जाणार नाही. शिव-शंभूंच्या कार्यासाठी शहरातील सर्वांनी (River Cyclothon 2025) पिंपरी-चिंचवड
एकत्र यावे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की,पवना, इंद्रायणी आणि मुठा या तीन नद्यांचे संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी सायकलचा वापर वाढवून नॉन-मोटराइज्ड वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या आरोग्यदायी वातावरणाला चालना मिळेल. नदी आणि शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची (River Cyclothon 2025 ) पिंपरी-चिंचवड
गरजआहे.
