पिंपरी प्रतिनिधी: प्रभाग क्रमांक ९ (गांधीनगर–खराळवाडी) या अनुसूचित जाती राखीव प्रभागातील समविचारी कार्यकर्ते आणि २०२५ च्या महापालिका निवडणुकीत रस असलेल्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्रभागातील सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा (PCMC Ward 9 Local Candidate)
झाली.
माझं पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी :महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून एकूण ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. (Draft Voter List) आता प्रभागनिहाय (PCMC Draft Voter List)मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
महापालिका हद्दीतील पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघ तसेच भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडे गाव या भागांतील मतदारयाद्या प्रभागनिहाय विभागून तयार (PCMC Draft Voter List)करण्यात येत आहेत.
पिंपरी प्रतिनिधी :केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभर १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहरात या मोहिमेची सुरुवात केली आहे. (Leprosy Detection Drive) महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत सर्व प्रभागांमध्ये घराघरांत भेटी देऊन नागरिकांची विनामूल्य तपासणी करण्यात येत (Leprosy Drive) आहे.
या पथकांमध्ये आशा स्वयंसेविका तसेच प्रशिक्षित Subhanallah सहभाग असून, ते सलग चौदा दिवस सर्वेक्षण करणार आहेत. (Leprosy Detection Drive) प्रत्येक पथक दररोज गृहभेटी देऊन त्वचेवरील पांढरे चट्टे, सुन्नपणा, नसांवरील सूज किंवा संवेदना कमी होणे अशा संभाव्य लक्षणांची तपासणी (Leprosy Drive) करत आहे.
अशापैकी कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास संबंधित नागरिकांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात येते. ‘महापालिकेची पथके नागरिकांशी संवाद साधत तपासणी करत आहेत. (Leprosy Detection Drive) रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज आहे. नागरिकांनी वर नमूद केलेली लक्षणे जाणवल्यास तात्काळ महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा’, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी (Leprosy Drive)केले आहे.
PCMC Indira Gandhi Jayanti :पिंपरी चिंचवड महापालिकेत इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन; अधिकारी–कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
पिंपरी, प्रतिनिधी :भारताच्या माजी पंतप्रधान व भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली. “देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय ऐक्य कायम राखण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करू. कोणत्याही परिस्थितीत हिंसाचाराचा अवलंब करणार नाही आणि धार्मिक, भाषिक, प्रादेशिक मतभेद तसेच इतर राजकीय–आर्थिक तक्रारी शांततामय आणि संविधानानुसार मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करू,” असा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. या शपथविधीचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
कार्यक्रमाला उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांसह विविध विभागांतील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
शपथेचे वाचन आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
—
PCMC Election Prep:पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तयारी वेगात; आयुक्त हर्डीकर यांचे अधिकारीांना निर्देश
(पिंपरी प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक जवळ येत असताना शहरातील मतदान केंद्रांची अंतिम निश्चिती, निवडणूक कक्षासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती, केंद्रांवरील सुविधा, अपंगजनांसाठी आवश्यक सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षा, मतदार यादीतील अद्ययावत प्रक्रिया, प्रभागांतील पायाभूत कामांची दुरुस्ती तसेच मतदार जागृती आणि तक्रार निवारण व्यवस्था मजबूत करण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश (PCMC Election Prep) दिले.
महापालिका आयुक्तांनी आज सार्वत्रिक निवडणुकीसह विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, शहर अभियंता मकरंद निकम यांसह आरोग्य, अभियांत्रिकी, स्मार्ट सिटी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित (PCMC Election Prep) होते.
बैठकीत आयुक्तांनी प्राथमिक सेवा, स्वच्छता मोहीम, खड्डेमुक्ती उपक्रम, मास्टर प्लॅनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आवश्यक ते बदल करण्याचे आदेश दिले. अवैध होर्डिंग हटविण्याची कारवाई, रस्ते प्रकाशयोजना सुधारणा, जलपुरवठा आणि ड्रेनेज यंत्रणेची देखभाल यावरही (PCMC Election Prep) त्यांनी भर दिला.
निवडणूक तयारीसंबंधी सर्व शाखांकडून सादर झालेल्या अहवालांची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करावा, अशी सूचना हर्डीकर यांनी केली. विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रलंबित कामांची गती वाढवावी, तसेच मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी (PCMC Election Prep) सांगितले.
सर्व प्रभागांमध्ये विशेष मोहीम राबवून अवैध होर्डिंग तातडीने हटवावीत, तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फलकांवर कठोर कारवाई करावी. अधिकृत होर्डिंगची अद्ययावत नोंद ठेवून महसूल विभागाशी समन्वय (PCMC Election Prep) वाढवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
River Cyclothon 2025:पुनःश्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल : ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’साठी तब्बल २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण
पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी :
इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, डुडूळगाव–मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सायक्लोथॉनसाठी २५ हजारांहून ( River Cyclothon 2025)
अधिक सहभागी नोंदले गेले आहेत.
आणखी केवळ ५ दिवस शिल्लक असताना नोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.
—
मोशीतील नव्या स्थळी पहिल्यांदाच आयोजन — विक्रमी गर्दीची अपेक्षा
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी भोसरी गावजत्रा मैदानावर होणारा हा उपक्रम यंदा प्रथमच मोशीतील अधिक प्रशस्त आणि आधुनिक स्थळी आयोजित करण्यात आला आहे.
पुणे–नाशिक महामार्गालगतची ही जागा मोठ्या संख्येने सायकलपटूंसाठी अत्यंत सोयीस्कर असून, आयोजकांनी यंदा ३५ हजारांहून अधिक सहभागाचा (River Cyclothon 2025)
अंदाज वर्तवला आहे.
गतवर्षी या सायक्लोथॉनने ‘जगातील सर्वांत लांब सायकल रांग’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती.
आता पुन्हा एकदा नवा विश्वविक्रम घडवण्याच्या दिशेने उपक्रम जोमाने पुढे सरसावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
—
पर्यावरण, आरोग्य आणि नदी स्वच्छतेचा संदेश — उपक्रम अंतिम टप्प्यात
या उपक्रमाचे संयुक्त आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांमध्ये आरोग्यजागृती हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
सायक्लोथॉनच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात नियोजन, सुरक्षा, मार्गव्यवस्था आणि सहभागींच्या सुविधा यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
—
प्रतिक्रिया : डॉ. निलेश लोंढे
“२५ हजार सायकलपटूंच्या सहभागाने रिव्हर सायक्लोथॉनसाठी निर्माण झालेला उत्साह खरोखर प्रेरणादायी आहे. पुढील पाच दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन इंद्रायणी नदी, पर्यावरण आणि भावी पिढ्यांसाठी हा उपक्रम जगापर्यंत पोहोचवावा. मोशीतील नव्या ठिकाणी सर्व सुविधा, सुरक्षा आणि पार्किंगची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे. चला, नदीसाठी आणि निसर्गासाठी पुन्हा एकदा इतिहास (River Cyclothon 2025)
घडवूया.”
— डॉ. निलेश लोंढे, मुख्य समन्वयक, रिव्हर सायक्लोथॉन 2025
—
Implant Success:मोरया हॉस्पिटलचा ३०० कॉक्लिअर इम्प्लांट सोहळा: आमदार जगतापांची दहा मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा
मोरया हॉस्पिटलच्या ३०० कॉक्लिअर इम्प्लांट सोहळ्यात भावनांचा ओलावा; आमदार जगतापांची दहा मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा
चिंचवड :कर्णबधिर मुलांना पुन्हा नव्या जगाचा ‘आवाज’ देणाऱ्या मोरया हॉस्पिटलच्या ३०० कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पूर्णत्व सोहळ्यात रविवारी हृदयाला स्पर्श करणारे क्षण अनुभवायला मिळाले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य आणि पालकांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे ( Implant Success )अनावर अश्रू संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे होते.
या विशेष सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार शंकरभाऊ जगताप यांनी कर्णबधिर मुलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. कॉक्लिअर इम्प्लांटची आवश्यकता असलेल्या दहा मुलांचे संपूर्ण संगोपन खर्च चंद्ररंग सोशल फाउंडेशनमार्फत उचलण्याचे त्यांनी जाहीर केले. या उदार घोषणेने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
जगताप यांनी मोरया हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत महाभारतातील संजयाचा उल्लेख केला.
“धृतराष्ट्राला संजयाने युद्धभूमीतील घडामोडी ऐकवल्या; त्याचप्रमाणे मोरया हॉस्पिटल या मुलांना जगाचा आवाज परत देणारे आधुनिक ‘संजय’ ठरले आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीमचे अभिनंदन केले.
भावनिक क्षणांनी भरलेले अनुभवकथन
कॉक्लिअर इम्प्लांटनंतर ऐकण्याची क्षमता परत मिळालेली मुले या सोहळ्यात उपस्थित होती. नीरजा घोडके, देवांश पाटील, आसावरी कुलकर्णी, रितिका सोमाणी, ओम साठे आणि प्रथमेश सावंत यांनी शस्त्रक्रियेनंतरचे अनुभव कथन करताना सभागृहातील वातावरण भावनिक केले.
“माझं मूल आता ‘आई’ म्हणतं… आवाज ओळखतं… त्याहून मोठं सुख नाही,” असे एका पालकांचे शब्द ऐकल्यावर क्षणभर सर्वत्र शांतता आणि अश्रूंची उधळण दिसून आली.
मान्यवरांची उपस्थिती आणि संवेदशील कार्याचा गौरव
कार्यक्रमाला आमदार शंकरभाऊ जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के, शल्यचिकित्सक डॉ. महेंद्र गरड, उद्योजक दिलीप व प्रवीण सोनिगरा तसेच मोरया हॉस्पिटलचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अक्षय वाचासुंदर, अमित पाटील, मुग्धा आरकडी, रक्षा देशपांडे आणि अविनाश वाचासुंदर यांनी ३०० शस्त्रक्रियांच्या मागील सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली. टीमवर्क, समर्पण आणि संयम या प्रवासातील मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
मानवतेचा क्षण साजरे करणारा उत्सव
प्रास्ताविक डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद पंडित यांनी केले. सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन भगवान तांबे, सारिका मोरे, संजय कुलकर्णी आणि कर्मचारी प्रतिनिधींनी उत्तम रीतीने सांभाळले.
कॉक्लिअर इम्प्लांट ही फक्त वैद्यकीय प्रक्रिया नाही—तर एका कुटुंबाला पुन्हा आशेची किरण देणारी जीवनदायी सेवा आहे. ३०० शस्त्रक्रियांचा आजवरचा प्रवास म्हणजे शेकडो घरांमध्ये उमटलेले नव्याने ऐकू येणारे हृदयस्पर्शी आवाज.
हा सोहळा फक्त यशाचा नव्हता—तो आवाज परत मिळालेल्या मुलांच्या पुनर्जन्माचा उत्सव होता.
Sanvidhan Value:शिक्षकांनी संविधान मूल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी – संविधान अभ्यासक नुरखॉं पठाणपिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मुख्याध्यापकांसाठी विशेष व्याख्यान
प्रतिनिधी :विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल (Sanvidhan Value) आदर, जाणीव आणि कर्तव्यबुद्धी रुजवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे मत संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी व्यक्त केले. संविधान हा राष्ट्राचा मूलग्रंथ असून त्यातील मूल्यांची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात घट्ट रोविणे ही शिक्षण क्षेत्राची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
संविधान दिन (२६ नोव्हेंबर) निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी चिंचवड स्टेशन येथील ॲटो क्लस्टरमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला उपायुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.भारतीयसंविधानाच्या (Sanvidhan Value) उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या माध्यमातून संविधानातील तत्त्वे, मूलभूत मूल्ये आणि नागरिकांचे कर्तव्य यांची पुन्हा एकदा उजळणी झाली. त्यानंतर नुरखॉं पठाण यांनी संविधानाची संकल्पना, नागरिकांचा संविधानाशी असलेला संबंध, दैनंदिन जीवनातील संविधानाचे महत्त्व, त्याचा उपयोग आणि स्वातंत्र्य चळवळीतील सामाजिक-राजकीय संघर्ष यावर सविस्तर मार्गदर्शन केले. संविधान निर्मितीची ऐतिहासिक प्रक्रिया, मसुदा समितीचे योगदान आणि भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी, तर(Sanvidhan Value) प्रास्ताविक संगीता बांगर यांनी केले.
Sangvai Blood Camp:सांगवीत गुजर स्नेहवर्धिनीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० रक्त पिशव्या संकलित
- पिंपरी प्रतिनिधी : गुजर स्नेहवर्धिनीच्या वतीने सांगवी गुजर बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरादरम्यान तब्बल ५० रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून, या मौल्यवान रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
Vilas Lande MLA :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विलास लांडे आघाडीवर; राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती स्पष्ट
प्रतिनिधी:आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलास लांडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पिंपरी-चिंचवड जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली असून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत लांडे समर्थकांमध्ये दिसून आले. त्यांच्या प्रतिक्रिया म्हणून ‘टायगर इज बॅक’ असा (Vilas Lande MLA) संदेशही जोरदारपणे उमटला.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जंबो कार्यकारिणी जाहीर केली होती. त्या यादीत विलास लांडे यांचे नाव मुख्य समन्वयक म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित नव्हते, (Vilas Lande MLA) यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, आकुर्डी परिसरातील एका गृहप्रकल्पाच्या अश्लील जाहिरातीबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते.
नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना विलास लांडे म्हणाले की,
“पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मनःपूर्वक आभार. ही जबाबदारी पूर्ण समर्पणाने आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा मला दृढ विश्वास आहे.
विकासकामांना गती देणे, नवीन पायाभूत सुविधा उभ्या करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे—या सर्व बाबींमध्ये मी पक्षाच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे. माझ्यासोबत समन्वयक म्हणून निवड झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.”
