प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पती-पत्नी दोघांनाही निवडून आणण्याचा ‘जोडी पॅटर्न’ पूर्णतः अपयशी ठरला आहे. शहरातील तीन महत्त्वाच्या प्रभागांमधून पती-पत्नी जोडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; मात्र एकाही जोडप्याला महापालिका सभागृहात एकत्र प्रवेश मिळू शकला नाही. मतदारांनी दिलेल्या या स्पष्ट निकालामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांना अनपेक्षित धक्का बसला असून, यंदाच्या सभागृहात ‘आम्ही दोघे,राजकारणाला’ स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले (Family Politics Rejected)आहे.
पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक
Akurdi Election Result:मुख्यमंत्र्यांची सभा असूनही आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय | प्रमोद कुटे पॅनेलची जादू
पिंपरी-चिंचवड — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आकुर्डी परिसराचा समावेश असलेल्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध करत तीन उमेदवारांना विजयी केले आहे. विशेष बाब म्हणजे, याच प्रभागात मुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गज नेत्यांची भव्य प्रचारसभा होऊनही मतदारांनी स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला कौल दिला (Akurdi Election Result) आहे.
या विजयामुळे राजकीय वर्तुळात “पॅनेल प्रमुख प्रमोद कुटे यांची जादू” अशी चर्चा रंगली आहे. संपूर्ण प्रभागात त्यांनी आखलेली रणनीती, प्रभावी जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार याचा थेट फायदा निकालात दिसून (Akurdi Election Result)आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार
या प्रभागातून
प्रमोद कुटे,
वैशाली काळभोर,
अरुणा लंगोटे
या तिन्ही उमेदवारांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला आहे. विशेषतः प्रमोद कुटे यांनी पॅनेल प्रमुख म्हणून संपूर्ण टीमला एकत्र ठेवत घराघरात पोहोचणारा प्रचार केला. मोठ्या सभा-मेळाव्यांपेक्षा थेट मतदार संवाद, स्थानिक विकासकामांचा लेखाजोखा आणि विश्वासार्ह नेतृत्व या मुद्द्यांवर त्यांनी भर (Akurdi Election Result)दिला.
मोठ्या नेत्यांच्या सभेचा मर्यादित प्रभाव
या प्रभागात राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या असल्या, तरी त्या सभांचा अपेक्षित परिणाम मतपेटीत दिसून आला नाही. मतदारांनी पक्षाच्या नावापेक्षा स्थानिक उमेदवारांचे काम, उपलब्धता आणि विश्वासार्हता याला प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले (Akurdi Election Result)आहे.
राजकीय अर्थ
हा निकाल एक महत्त्वाचा संदेश देतो —
फक्त मोठी नावे आणि भव्य सभा पुरेशा ठरत नाहीत, तर स्थानिक पातळीवर केलेले सातत्यपूर्ण कामच विजयाची गुरुकिल्ली ठरते. आकुर्डी प्रभागातील निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, आगामी महापालिकेच्या राजकारणात या विजयाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात (Akurdi Election Result)आहे.
Democracy Example:प्रचारात विरोधक, मतदानानंतर मित्र; प्रभाग १५ मधील नेत्यांनी जिंकली मने
(विवेक कुलकर्णी )मतदानानंतर राजकारणाला विराम, मैत्रीला सन्मान-प्रभाग १५ मध्ये प्रगल्भ लोकशाहीचा प्रेरणादायी (Democracy Example) क्षण**
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृतरीत्या पूर्णविराम दिल्यानंतर प्रभाग क्रमांक १५ मध्ये एक अत्यंत सकारात्मक, दिलासा देणारा आणि लोकशाही मूल्यांना उजाळा देणारा क्षण पाहायला मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांपेक्षा आपणच अधिक सक्षम आहोत, हे मतदारांपर्यंत पोहोचवणारे सर्वच उमेदवार मतदान संपताच एकत्र आले आणि एकमेकांच्या गळ्यात हात टाकून मैत्रीचा धर्म जपत असल्याचे दृश्य निर्माण (Democracy Example) क्षण**झाले.
राजकीय मतभेद, पक्षीय भूमिका आणि प्रचारातील तीव्रता या सगळ्यांवर मात करत उमेदवारांनी दाखवलेली ही सलोख्याची भूमिका पाहून प्राधिकरण परिसरातील नागरिकांना मनापासून आनंद झाला. “निवडणूक येतात-जातात, पण समाजात शांतता, सुरक्षितता आणि परस्पर सन्मान टिकून राहणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक सुजाण मतदारांनी व्यक्त(Democracy Example) क्षण** केली.
या प्रसंगी भाजपाचे राजू मिसाळ, अमित गावडे, युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. राजकीय स्पर्धक असूनही एकत्र उभे राहून हास्यविनोद करत संवाद साधताना दिसणारे हे नेते अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त (Democracy Example) क्षण**केली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, “राजकारण त्याच्या जागी, मैत्री आपल्या जागी,” असे सांगत निगडी येथील सुप्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले अनुप मोरे, अमित गावडे आणि निलेश शिंदे यांनी आपल्या वागणुकीतून प्रगल्भतेचे दर्शन घडवले. शिक्षणातून मिळालेले संस्कार, संवादातून दिसणारी समजूतदारपणा आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा या साऱ्यांचे प्रत्यंतर या एका(Democracy Example) क्षण** क्षणात आले.
या सौहार्दपूर्ण वातावरणामुळे प्रभाग क्रमांक १५ हा केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही सक्षम आणि सुरक्षित असल्याची भावना प्राधिकरणवासीयांमध्ये अधिक दृढ झाली आहे. निवडणूक संपल्यानंतरही कटुता न ठेवता एकमेकांशी सलोख्याने वागता येते, हा सकारात्मक संदेश या नेत्यांनी संपूर्ण शहराला (Democracy Example) क्षण**दिला आहे.
आजच्या काळात राजकारणाकडे संशयाने पाहिले जाते, तेव्हा अशा प्रसंगांमुळे लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट होतो. सत्ता, विजय किंवा पराभव यापलीकडे जाऊन लोकसेवा, माणुसकी आणि सामाजिक ऐक्य महत्त्वाचे असते, हे अधोरेखित करत प्रभाग १५ मधील या नेत्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले(Democracy Example) क्षण** आहे.
PCMC Election Counting:पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी आराखड्यास आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांची मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी आज मंजुरी दिली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण व्हावी, या दृष्टीने सर्व आवश्यक बाबींचा समावेश या आराखड्यात करण्यात आला (PCMC Election Counting) आहे.
या आराखड्यानुसार मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन तसेच वैद्यकीय सुविधांचा सविस्तर तपशील निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस विभागाशी समन्वय साधण्यात आला असून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार (PCMC Election Counting)आहे.
मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारण्यात येणार (PCMC Election Counting) आहे.
मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार (PCMC Election Counting) आहे.
मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडून नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी (PCMC Election Counting) यावेळी दिल्या.
PCMC police:निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४७ जणांवर मकोका, ८७ तडीपार; ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक शांततेत, सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्यापक आणि कडक उपाययोजना केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून ८७ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहे. तसेच ९ गुन्हेगारी टोळ्यांमधील ४७ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली (PCMC police) आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी तपासणीत १६ लाख १७ हजार ४०० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. या रकमेची निवडणूक विभाग व आयकर विभागामार्फत पडताळणी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जात (PCMC police) आहे.
दारूबंदी व इतर कायद्यांतर्गत ९६२ जणांवर कारवाई करण्यात आली असून ८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. एनडीपीएस कायद्यान्वये ७ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच ४३८ गुन्हेगारांना स्थानिक क्षेत्राबाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात (PCMC police) आला आहे.
पोलिसांनी विशेष मोहिमेत ९ पिस्तूल जप्त करत ११ जणांना अटक केली असून २३ इतर घातक शस्त्रे जप्त करून २२ जणांना अटक करण्यात आली आहे. अवैध शस्त्रविरोधी मोहिमेत एकूण ९१ पिस्तूल जप्त करण्यात आली (PCMC police) आहेत.
दारूबंदी प्रकरणी २७६ कारवायांमध्ये १० लाख ३६ हजार ९७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गांजा, एमडी, ओजी कुश गांजा यांसारख्या अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी १८ कारवायांमध्ये ६६ लाख १९ हजार ५३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (PCMC police) आहे.
मनपा निवडणुकीसाठी ४२० इमारतींमध्ये मतदान केंद्र
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एकूण ३२ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील ४२० इमारतींमध्ये एकूण २ हजार १३५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर बाह्य बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले (PCMC police) आहे.
नागरिकांनी निर्भय वातावरणात शांततेत मतदान करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले (PCMC police) आहे.
पिंपरी (प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ किवळे-रावेत-विकासनगर प्रभाग क्रमांक १६ मध्ये आयोजित प्रचार सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ९) मार्गदर्शन केले. या सभेमुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश(Eknath Shinde Rally) संचारला आहे.
या सभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बालासाहेब ओव्हाळे, रेश्मा कातळे, ऐश्वर्या तरस आणि निलेश तरस यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. किवळे-रावेत-विकासनगर परिसरातील मुठाई चौकात ही प्रचार सभा आयोजित करण्यात आली (Eknath Shinde Rally )होती.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमेद इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख सुरेखा उबाळे, उपजिल्हाप्रमुख राजेश खांबे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख विश्वजित बारणे, जिल्हा संपर्क प्रमुख बालासाहेब वालकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शीतल भोंडे, महानगरप्रमुख राजेश वालकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित(Eknath Shinde Rally) होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भगव्याचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. या भूमीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत राहणार नाही, तर सत्तेचा निर्णायक घटक ठरेल. हिंदुत्वसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे. शिवसेनेच्या विचारांशी तडजोड होणार(Eknath Shinde Rally) नाही.”
प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीला अधिकृत सुरुवात होत असतानाच शहरात पहिला उमेदवारी अर्ज दाखल होण्याची नोंद झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शहरात ‘पहिला अर्ज’ दाखल करण्याचा मान (PCMC Election 2026)पटकावला आहे.
निवडणूक प्रक्रियेतील हा पहिला टप्पा असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. भाजपकडून मिशन 2026 अंतर्गत तयारीला सुरुवात झाल्याचे संकेत या उमेदवारी अर्जातून स्पष्टपणे दिसून येत (PCMC Election 2026) आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिककेंद्रित धोरणे” या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार असल्याचे सचिन चिंचवडे यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रभाग 17 मधील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधांबाबत पुढील काळात ठोस आराखडा मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी (PCMC Election 2026)सांगितले.
माजी उपमहापौर म्हणून केलेल्या कामांचा अनुभव आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आपण मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवू, असा विश्वास चिंचवडे यांनी व्यक्त केला. शहरात सर्वात पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे भाजपच्या प्रचाराची सुरुवात इतर पक्षांपेक्षा आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगू लागली (PCMC Election 2026) आहे.
पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक 2026 मध्ये प्रभाग 17 हा अत्यंत महत्त्वाचा आणि लक्षवेधी प्रभाग मानला जात असून, या प्रभागातून सचिन चिंचवडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत आता अधिकच वाढली( PCMC Election 2026)आहे.
प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र लढवायची की युती करून, याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शहर भाजपची कोअर कमिटी घेणार असून, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (२२ नोव्हेंबर) आयोजित पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात( BJP Election Decision) ते बोलत होते.
या मेळाव्यास शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, तसेच माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या (BJP Election Decision) उपस्थित होत्या.
यावेळी विविध पक्ष आणि संघटनांमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात बजरंग दलाचे पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक, आशाताई सोदाई, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष हेमंत राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) युवा नेते जगदीश येवले, प्रभाग क्रमांक १७ चिंचवडे नगर येथील धनंजय आंबुसकर, संत तुकाराम नगर प्रभागातील डॉ. संदीप बागडे, प्रभाग क्रमांक १४ चे संतोष चौगुले, तसेच पिंपळे सौदागर येथील उद्योजक संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, कायदा आघाडी, शहरातील सर्व मंडळे आणि विविध आघाड्यांच्या नव्या कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात (BJP Election Decision) आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते विचारांच्या आधारावर पक्षाशी जोडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताची ओळख जगभरात अधिक दृढ झाली आहे. देशहिताचा विचार करणारा पक्ष फक्त भाजप आहे, तर इतर प्रादेशिक पक्षांचा अजेंडा प्रामुख्याने कुटुंबाभोवती फिरत असतो. आपला अजेंडा हा देश आणि देशाच्या प्रगतीसाठी आहे.”तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर ५१ टक्के मतांचे लक्ष्य साध्य करण्याचे आवाहन केले आणि ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’चा मंत्र प्रत्येक नागरिकापर्यंत (BJP Election Decision) पोहोचवण्याचे निर्देश दिले.
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत १०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि शहरात पुन्हा भाजपचा महापौर होईल. त्यासाठी पदवीधर मतदार नोंदणी वाढविणे अत्यंत आवश्यक (BJP Election Decision )आहे.”
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ‘शंभर पार’चा नारा देत, महानगरपालिका निवडणुकीत भक्कम विजय मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, अशी मागणी (BJP Election Decision)त्यांनी केली.
मेळाव्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले, तर सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी केले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार( BJP Election Decision )पडला.
