पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारत दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कामगाराचा मृत्यू आणि अनेक कामगार तब्बल ६५ तास ढिगाऱ्याखाली अडकून पडण्यास कारणीभूत ठरलेल्या तीन मजली इमारतीपैकी केवळ तळमजल्यालाच पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) दिला होता. वरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांना अधिकृत परवानगी किंवा पूर्णत्वाचा दाखला नसल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले (Garbage Depot Accident) आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने २७ जुलै २०२३ रोजी मंजूर आराखड्यानुसार इमारतीच्या तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला दिला होता. मात्र, या प्रमाणपत्रात पहिला व दुसरा मजला यांचा कोणताही उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. शहर अभियंता मनोज सेठिया यांनीही या दोन मजल्यांसाठी परवानगी मागितल्याची कोणतीही नोंद किंवा पुरावा विभागाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले (Garbage Depot Accident)आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पर्यावरण विभागाने २६ जुलै २०२३ रोजी सुधारित बांधकामाचा प्रस्ताव सादर केला आणि अवघ्या २४ तासांत, म्हणजेच २७ जुलै रोजी तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. इतक्या कमी कालावधीत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी झाली होती का, की पाहणी न करताच प्रमाणपत्र देण्यात आले, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत (Garbage Depot Accident) आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ तळमजल्यालाच परवानगी असताना वरचे दोन मजले कोणाच्या मंजुरीने बांधण्यात आले? पूर्णत्वाचा दाखला नसताना त्या मजल्यांवर कँटीन आणि परिषद कक्ष कशाच्या आधारे सुरू करण्यात आले? तसेच अशा इमारतीत कर्मचारी आणि कामगारांना काम करण्याची परवानगी कोणी दिली, याचाही तपास होण्याची मागणी होत(Garbage Depot Accident) आहे.

या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेक कामगारांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. त्यामुळे २०२३ मधील परवानगी प्रक्रिया, संबंधित पर्यावरण विभागाचे अधिकारी, बांधकाम परवानगी विभाग, संबंधित कंत्राटदार तसेच या संपूर्ण प्रकरणातील जबाबदार व्यक्तींची भूमिका निष्पक्ष आणि सखोल चौकशीतून स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत (Garbage Depot Accident) आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व बाबींची अधिकृत चौकशी सुरू असून चौकशी अहवालानंतरच जबाबदारी आणि नियमभंगाबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार(Garbage Depot Accident) आहेत.

