Home माझं पिंपरी चिंचवड Navayug Shravani Kavya :नवयुग साहित्य मंडळाची ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा; १२ ऑगस्टपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

Navayug Shravani Kavya :नवयुग साहित्य मंडळाची ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा; १२ ऑगस्टपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवडमध्ये नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या ३३ व्या श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन. १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत व्हॉट्सॲपवर कविता पाठवण्याचे आवाहन. २६ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष सादरीकरणासह स्पर्धा होणार.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २३ जुलै २०२६) : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुक कवी-कवयित्रींनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत आपली कविता व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले (Navayug Shravani Kavya)आहे.

 

स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपली एक कविता नवयुगचे संचालक ॲड. अरविंद वाडकर यांच्या ९८२२८८४९९२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर टाईप करून पाठवायची आहे. स्पर्धेत सहभागासाठी प्रवेशशुल्क नसून स्पर्धकांना कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वतःची कविता सादर करावी लागणार आहे. सादरीकरणालाही गुण दिले जाणार (Navayug Shravani Kavya)आहेत.

 

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम (Navayug Shravani Kavya)राहील.

 

स्पर्धेच्या नियमांनुसार कवितेला कोणतेही विषयबंध नसले तरी ती किमान १२ आणि कमाल २० ओळींची असावी. कवितेच्या सुरुवातीला ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्य स्पर्धा ३३ साठी’ असा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यानंतर कवितेचे शीर्षक, कविता, संपूर्ण नाव, परिसर आणि संपर्क क्रमांक नमूद(Navayug Shravani Kavya) करावा.

 

कवितेमधून राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही तसेच कोणत्याही जाती-धर्मावर टीका करणारा मजकूर नसावा. केवळ व्हॉट्सॲपवर टाईप करून पाठविलेल्या कविता ग्राह्य धरल्या जाणार असून हस्तलिखित किंवा फोटो स्वरूपातील कविता स्वीकारल्या जाणार नाहीत. नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार (Navayug Shravani Kavya)नाहीत.

 

दरम्यान, ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता पिंपरी-चिंचवड परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नेमके स्थळ स्पर्धेच्या आठ दिवस आधी जाहीर करण्यात(Navayug Shravani Kavya) येईल.

 

अधिक माहितीसाठी मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांच्याशी ८८८८४३४३३१ या क्रमांकावर संपर्क(Navayug Shravani Kavya) साधावा.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00