Home माझं पिंपरी चिंचवड Yuvan Youth Initiative:प्रतिभा महाविद्यालयात ‘युवान’ युवा उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण; ५० हजार युवक सामाजिक कार्यात सहभागी

Yuvan Youth Initiative:प्रतिभा महाविद्यालयात ‘युवान’ युवा उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण; ५० हजार युवक सामाजिक कार्यात सहभागी

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात 'युवान' युवा उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली १ ते १५ ऑगस्टदरम्यान ५० हजार युवक विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. १९ : चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या सहकार्याने ‘युवान’ या विशेष युवा उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात (Yuvan Youth Initiative)आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, पूर्णम इकोव्हिजनचे संचालक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह सचिन कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सचिन कुलकर्णी यांनी ‘युवान’ उपक्रमाची उद्दिष्टे आणि स्वरूप याविषयी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन (Yuvan Youth Initiative)केले.

कार्यक्रमास एनएसएस समन्वयक सुप्रिया गायकवाड, प्रवाह सोशल फाऊंडेशनचे शेखर पंडित, श्रेयस ठाकरे, अक्षय पंगूडवाले, अक्षय केळकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित (Yuvan Youth Initiative)होते.

प्रवाह सोशल फाऊंडेशनच्या वतीने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली ‘युवान’ हा विशेष उपक्रम १६ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसाठी राबविण्यात येत आहे. १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुणे विद्यापीठ परिसरातील ५० हजारांहून अधिक युवक-युवती पर्यावरण, गडकोट संवर्धन, शिक्षण, आरोग्य, शेती, शाश्वत विकास आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये स्वयंसेवी योगदान देणार (Yuvan Youth Initiative)आहेत.

या अभियानात प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थीही सक्रिय सहभाग घेणार असून, त्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी यावेळी (Yuvan Youth Initiative)दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00