Home गुन्हे Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले(Garbage Depot Accident)आहेत.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित (Garbage Depot Accident)होते.

बैठकीत आयुक्तांनी दुर्घटनेची प्राथमिक चौकशी जलदगतीने पूर्ण करून जबाबदार कंपनीची भूमिका निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित कंपनीविरुद्ध तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश (Garbage Depot Accident)दिले.

दरम्यान, ८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मोशी कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा एका इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत इमारतीत तसेच परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले (Garbage Depot Accident)होते.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय सैन्य, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तरीत्या तातडीने बचावकार्य सुरू केले. दुर्घटना घडल्यानंतर पाच नागरिक स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर उर्वरित १८ नागरिकांपैकी नऊ जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर (Garbage Depot Accident)काढले.

दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले (Garbage Depot Accident)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00