पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम पुराच्या विळख्यात सापडले असून, येथे शिक्षण घेणाऱ्या शेकडो मुलांच्या निवारा, शिक्षण आणि दैनंदिन जीवनावर मोठे संकट ओढवले आहे. नदीकाठावर वसलेल्या गुरुकुलाच्या वर्गखोल्या आणि निवासी वसतिगृहात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला(Punarutthan Samrasata Gurukulam) आहे.
या परिस्थितीत मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना तातडीने काळेवाडी येथील महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षित निवारा मिळाला असला तरी या मुलांसमोर आता दैनंदिन गरजांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यांच्यासाठी चादरी, ब्लँकेट्स, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर अत्यावश्यक साहित्याची तातडीची आवश्यकता (Punarutthan Samrasata Gurukulam) आहे.
ही केवळ एका शाळेची अडचण नाही, तर समाजातील अनेक वंचित, आधाराच्या शोधात असलेल्या मुलांच्या भवितव्याशी निगडित असलेला प्रश्न आहे. शिक्षण, संस्कार आणि स्वाभिमानाच्या बळावर आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले (Punarutthan Samrasata Gurukulam)आहे.
या गुरुकुलाचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या पुनर्वसनासाठी अविरत कार्य केले आहे. त्यांच्या या समर्पित सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले आहे. आज त्याच गुरुकुलावर संकट कोसळले असून, समाजानेही त्यांच्या कार्यामागे ठामपणे उभे राहण्याची वेळ आली (Punarutthan Samrasata Gurukulam) आहे.
दरम्यान, गुरुकुलातील सुमारे ३०० गायी आणि वासरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, त्यांच्या चारा आणि देखभालीचेही मोठे आव्हान निर्माण झाले(Punarutthan Samrasata Gurukulam) आहे.
या कठीण प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह आणि नागरिकांनी शक्य त्या स्वरूपात मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज दिलेली छोटीशी मदतही या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवू शकते आणि त्यांच्या शिक्षणाचा आधार कायम ठेवू (Punarutthan Samrasata Gurukulam) शकते.
संकट मोठे आहे… पण समाज एकवटला तर कोणतेही संकट मोठे राहत(Punarutthan Samrasata Gurukulam) नाही.
