Home आरोग्य Mpc News Impact :माझं पिंपरी चिंचवडचा इम्पॅक्ट! रावेतमधील धोकादायक खांब हटवला; नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाकडून तातडीने दखल

Mpc News Impact :माझं पिंपरी चिंचवडचा इम्पॅक्ट! रावेतमधील धोकादायक खांब हटवला; नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाकडून तातडीने दखल

माझं पिंपरी चिंचवडच्या बातमीनंतर रावेतच्या भोंडवे चौकातील धोकादायक खांब हटवण्यात आला. नागरिकांच्या सूचनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी परिसरातील अलीकडील दुर्दैवी दुर्घटनेची आठवण अजूनही नागरिकांच्या मनातून गेलेली नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संभाव्य धोके वेळेत ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे हीच खरी खबरदारी (Mpc News Impact)ठरते.

काही दिवसांपूर्वी माझं पिंपरी चिंचवड या पोर्टलचे जागरूक वाचक लक्ष्मण भणगे यांनी रावेत येथील भोंडवे चौकातील धोकादायकरीत्या वाकलेल्या खांबाचा फोटो आमच्याकडे पाठवून, याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली (Mpc News Impact)होती.

यानंतर या गंभीर विषयाची दखल घेत बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणेने त्वरित कार्यवाही करत हा धोकादायक खांब हटवला आहे. संभाव्य दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले (Mpc News Impact)आहे.

या घटनेचे श्रेय केवळ आमच्या बातमीला नसून, आमच्या पोर्टलवर विश्वास ठेवून समाजहिताचे प्रश्न वेळेवर आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या जागरूक वाचकांना आहे. नागरिक, माध्यमे आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास अनेक संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण (Mpc News Impact)आहे.

माझं पिंपरी चिंचवड समाजहिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी यापुढेही तितक्याच जबाबदारीने आणि बांधिलकीने कार्य करत राहील, अशी आम्ही ग्वाही देत(Mpc News Impact) आहोत.

तसेच, नागरिकांच्या सूचनेची तातडीने दखल घेऊन योग्य वेळी कारवाई करणाऱ्या संबंधित प्रशासनाचेही आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच धोका दूर करणे हेच खरे सुशासन असून, अशा कार्याचे निश्चितच कौतुक व्हायला(Mpc News Impact) हवे.

आपणही आपल्या परिसरात अशा प्रकारचा कोणताही संभाव्य धोका आढळल्यास त्याची माहिती व छायाचित्र आमच्यापर्यंत पोहोचवा. समाजहितासाठी आपण सर्वजण मिळून सुरक्षित पिंपरी-चिंचवड (Mpc News Impact)घडवूया.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00