31
(आकुर्डी,प्रतिनिधी दि. ४) : नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. श्रेया गजानन देवचे हिने माध्यमिक पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरी विभागातून ३७४ वा क्रमांक मिळवत तिने गुणवत्ता यादीत स्थान (Scholarship Exam) मिळविले.
श्रेयाला या यशासाठी धनश्री बेंडाळे, जगदीश चव्हाण, राजेंद्र सोनवणे आणि परशुराम रेंगडे यांचे मार्गदर्शन (Scholarship Exam) लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव, प्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी श्रेयाचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा (Scholarship Exam) दिल्या.
