Home तंत्रज्ञान Shivneri Housing Society:शिवनेरी गृह निर्माण संस्थेच्या रहिवाशांचे स्मार्ट मीटरविरोधात महावितरणला निवेदन

Shivneri Housing Society:शिवनेरी गृह निर्माण संस्थेच्या रहिवाशांचे स्मार्ट मीटरविरोधात महावितरणला निवेदन

पिंपरीतील शिवनेरी गृह निर्माण संस्था (प्रधानमंत्री आवास योजना) येथील रहिवाशांनी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर हटवून जुने मीटर बसविण्याची मागणी करत आकुर्डी महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले. वीज बिलातील वाढ व तफावतीची चौकशी करण्याची मागणी.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी) : शिवनेरी गृह निर्माण संस्था (प्रधानमंत्री आवास योजना) येथील रहिवाशांच्या वतीने गुरुवारी (२ जुलै) आकुर्डी येथील महावितरण कार्यालयात प्रीपेड स्मार्ट मीटर हटवून पूर्वीचे वीज मीटर बसविण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात (Shivneri Housing Society)आले.

 

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलात अनपेक्षित वाढ, वीज वापराच्या नोंदीतील तफावत तसेच बिलांच्या अचूकतेबाबत शंका निर्माण झाल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून अन्यायकारक आकारण्यात आलेली रक्कम समायोजित करावी, अशीही मागणी करण्यात (Shivneri Housing Society)आली.

 

मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी (Shivneri Housing Society)दिला.

 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर, विशाल भालेराव, जिजाबराव जाधव, अंकुश गंगणे, सादिक पठाण, युवराज चौधरी, विक्रम बनकर, प्रकाश ईजगत, बालाजी पाटील, तुकाराम भालेराव, विपुल झोपे, उत्तम बाबरे, अलंकार, जुनेद अन्सारी, रवी गवळी, दिनेश काळे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक रहिवासी उपस्थित (Shivneri Housing Society)होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00