Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Live Streaming :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद; सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड

PCMC Live Streaming :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद; सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ जूनच्या सभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना घरबसल्या पाहता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाईन थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या सोमवार, दि. १५ जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे कोणतेही थेट प्रक्षेपण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले (PCMC Live Streaming)  आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून सभागृहाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने थेट दाखविण्याची मागणी होत होती. त्यानुसार तत्कालीन महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला सभेचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना नगरसेवकांचा सभागृहातील सहभाग, विविध विषयांवरील भूमिका आणि प्रभागातील प्रश्नांबाबतची त्यांची बांधिलकी थेट पाहता येत (PCMC Live Streaming) होती.

लाईव्ह प्रक्षेपणामुळे अनेक नगरसेवकांनी आपल्या भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांपर्यंत पोहोचविले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अधिक पारदर्शक झाल्याचे मत व्यक्त केले जात (PCMC Live Streaming )होते.

मात्र, काही वादग्रस्त विषयांवरील चर्चांदरम्यान सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि कारभारी अडचणीत आले होते. काही प्रसंगी सभागृहातील वक्तव्यांमुळे तत्कालीन महापौरांना दिलगिरीही व्यक्त करावी लागल्याची उदाहरणे समोर आली. त्यामुळे थेट प्रक्षेपणामुळे राजकीय अडचणी वाढत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू (PCMC Live  Streaming)होती.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि सत्ताधारी पक्षाने थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आगामी सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार नसल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली (PCMC Live Streaming)आहे.

दरम्यान, पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा उपक्रम बंद करण्याच्या निर्णयावरून विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा पारदर्शक कारभाराचा मुद्दा चर्चेत आला (PCMC Live Streaming)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00