पिंपरी-चिंचवड, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत विषयपत्रिकेवर अर्थसंकल्पाचा विषय नसतानाही महापौर रवी लांडगे यांनी १,१०० कोटी रुपयांच्या उपसूचनांना मंजुरी दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले (PCMC Budget Controversy) आहे.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत १५ विषय चर्चेसाठी होते. मात्र, अचानक १,१०० नवीन विकासकामांच्या उपसूचना मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. या कामांसाठी १९६.९० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली (PCMC Budget Controversy) आहे.
महापालिकेने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या मदतीने ९,३२२.१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, शहरासाठी २२ नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यात ‘रतन टाटा म्युझियम गॅलरी’ आणि ‘सिग्नल-मुक्त शहर’ योजनेचा समावेश आहे. तसेच पुढील २५ वर्षांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी मुदत ठेवी मोडण्याची तयारीही दर्शवण्यात आली (PCMC Budget Controversy) आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी ‘विषयपत्रिकेवर नसताना उपसूचना मंजूर करणे हा लोकशाहीचा खून आहे,’ अशी टीका करत आर्थिक गैरव्यवहार झाकण्यासाठी घाईघाईने मंजुरी दिल्याचा आरोप केला (PCMC Budget Controversy) आहे .

