Home माझं पिंपरी चिंचवड Vachal Tar Vachal :वृत्तपत्रे वाचणे हा छंद जडावा” : दिलासा संस्थेचा पिंपळे गुरवमध्ये जनजागृती उपक्रम

Vachal Tar Vachal :वृत्तपत्रे वाचणे हा छंद जडावा” : दिलासा संस्थेचा पिंपळे गुरवमध्ये जनजागृती उपक्रम

पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरात दिलासा संस्थेच्या वतीने ‘नियमित वृत्तपत्रे वाचा’ जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. आण्णा जोगदंड यांनी वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.

by Admin
Spread the love

पिंपळे गुरव, दि. ११ जून २०२६ : मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात वृत्तपत्र वाचनाची सवय कमी होत चालली असताना, नागरिकांमध्ये नियमित वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी दिलासा संस्थेच्या वतीने “नियमित वृत्तपत्रे वाचा – वाचाल तर वाचाल” हा जनजागृती उपक्रम पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरात राबविण्यात (Vachal Tar Vachal)आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड होते. यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, अरुण परदेशी, संगीता जोगदंड, वनिता पुजारी, मंदा भारतकर, डॉ. आर. डी. पाटील, सानिका पाटील, सुयश कदम, चंद्रकांत घाटे, शहाजी ढोरमले, वीणा मेंगरती, प्रमोद राऊत आणि संजय शितोळे उपस्थित (Vachal Tar Vachal)होते.

यावेळी बोलताना आण्णा जोगदंड म्हणाले, “मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात वृत्तपत्र वाचनाची सवय लुप्त होत चालली आहे. सोशल मीडिया आणि युट्युबसारख्या माध्यमांतून अनेकदा अपूर्ण अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होते. मात्र वृत्तपत्रे बातम्यांची शहानिशा करून सत्य आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतात. तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि साहित्यिकांचे लेखनही वृत्तपत्रांमधून वाचायला मिळते. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रत्येक घरात किमान एक तरी वृत्तपत्र असणे आवश्यक (Vachal Tar Vachal)आहे.”

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, “वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. अत्यल्प किंमतीत उपलब्ध होणारी वृत्तपत्रे मुलांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे नियमित वृत्तपत्र वाचनाची सवय प्रत्येकाने जोपासली(Vachal Tar Vachal) पाहिजे.”

या उपक्रमांतर्गत फेमस चौक, नवी सांगवी येथील वृत्तपत्र विक्रेती राऊबाई बिराजदार, साई चौक येथील वृत्तपत्र विक्रेते गौरव मोकाशी आणि सृष्टी चौक येथील वृत्तपत्र विक्रेती मंगल दापकेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सृष्टी चौक परिसरात घराघरांत वृत्तपत्रांचे वितरण करून “वृत्तपत्रे वाचा – वाचाल तर वाचाल” हा संदेश (Vachal Tar Vachal)दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुरलीधर दळवी यांनी(Vachal Tar Vachal) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00