पिंपरी-चिंचवड : वाकड येथील सुकासा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागावर वादग्रस्त बांधकामाला नियमबाह्य मंजुरी दिल्याचा आरोप केला आहे. रहिवाशांच्या मते, सोसायटीकडून फेब्रुवारी २०२६ पासून विविध हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अंतिम निर्णय न घेता संबंधित प्रकल्पाला १ जून २०२६ रोजी मंजुरी देण्यात (Wakad Sucasa Society)आली.
रहिवाशांचा दावा आहे की, संबंधित व्यावसायिक प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याच्या रुंदीबाबत युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स (UDCPR) मधील निकषांचे पालन झालेले नाही. तसेच सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याचा वापर आणि बांधकाम मंजुरी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला (Wakad Sucasa Society) आहे.
जागामालक विठ्ठल कलाटे, निखिल कलाटे, ऋषिकेश कलाटे, अविनाश कलाटे आणि अमोल कलाटे यांनी सुकासा सोसायटीची संरक्षक भिंत बेकायदेशीरपणे पाडून अंतर्गत जागेवर ‘मल्टीफिट जिम’, ‘झेप्टो’ व ‘फ्लिपकार्ट’चे डार्क स्टोअर, ‘पुरोहित हॉटेल’ आणि स्नूकर हाऊस उभारले आहे. या बेकायदेशीर व्यापारी वापरामुळे सोसायटीतील लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला (Wakad Sucasa Society)आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंजुरी प्रक्रियेची पडताळणी करावी आणि रहिवाशांच्या तक्रारींवर न्याय्य तोडगा काढावा, अशी मागणी सोसायटीतील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली (Wakad Sucasa Society)नाही.
