Home गुन्हे Illegal Liquor:अवैध दारू माफियांवर मोठा प्रहार; ५ दिवसांत १६१ गुन्हे, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Liquor:अवैध दारू माफियांवर मोठा प्रहार; ५ दिवसांत १६१ गुन्हे, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक मोहीम. पाच दिवसांत १६१ गुन्हे दाखल, १७० आरोपींवर कारवाई तर ४० लाखांहून अधिक किमतीची गावठी व हातभट्टी दारू जप्त किंवा नष्ट.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : गावठी हातभट्टी आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत अवघ्या पाच दिवसांत मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मे ते १ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ४० लाख ५ हजार ५३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त अथवा नष्ट करण्यात आला. या कारवाईत १६१ गुन्हे दाखल करून १७० आरोपींवर कारवाई करण्यात आली (Illegal Liquor) आहे.

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणानंतर अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शहरातील विविध भागांत एकाचवेळी धाडी टाकून पोलिसांनी अवैध दारू धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती (Illegal Liquor)घेतली.

अपायकारक दारू प्रकरणात १० आरोपी जेरबंद

मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अपायकारक पदार्थांच्या वापरासंदर्भात भारतीय न्याय संहिता कलम १२३ आणि दारुबंदी कायद्यान्वये १० गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १,१४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत ११ लाख २१ हजार ३३६ रुपये असल्याचे पोलिसांनी (Illegal Liquor) सांगितले.

हातभट्ट्यांवर धडक; २२ हजार लिटर दारू नष्ट

अवैध हातभट्टी दारू उत्पादन केंद्रांवर टाकलेल्या धाडीत सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान २२ हजार ८० लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली. या दारूची अंदाजे किंमत ९ लाख २९ हजार रुपये इतकी असल्याचे समोर आले (Illegal Liquor) आहे.

विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई

अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली. दारुबंदी कायद्यांतर्गत १४५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १५४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २८ हजार ९८९ लिटर गावठी व हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत १९ लाख ५५ हजार २०० रुपये (Illegal Liquor) आहे.

५२ हजार लिटरहून अधिक दारू जप्त किंवा नष्ट

विशेष मोहिमेअंतर्गत एकूण ५२ हजार २०९ लिटर गावठी व हातभट्टी दारू जप्त अथवा नष्ट करण्यात आली. पाच दिवसांत १७० आरोपींवर १६१ गुन्हे दाखल करत पोलिसांनी अवैध दारू माफियांना मोठा दणका दिला(Illegal Liquor) आहे.

नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन

अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे. नागरिक ११२ या आपत्कालीन क्रमांकावर, ९५२९६९१९६६ या नियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२०-२६२०९१२२ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्यांची गोपनीयता राखली जाईल आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले (Illegal Liquor) आहे.

अवैध दारूविरोधातील ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी(Illegal Liquor) सांगितले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00