Home माझं पिंपरी चिंचवड IPL Qualifier 2: शुभमन गिलच्या शतकाने गुजरात टायटन्स फायनलमध्ये, राजस्थान रॉयल्सचा पराभव

IPL Qualifier 2: शुभमन गिलच्या शतकाने गुजरात टायटन्स फायनलमध्ये, राजस्थान रॉयल्सचा पराभव

IPL Qualifier 2 मध्ये शुभमन गिलच्या शानदार शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांची खेळीही ठरली व्यर्थ.

by Admin
Spread the love

कॅप्टन गिलच्या धडाकेबाज शतकाने गुजरातचा फायनलमध्ये दणदणीत प्रवेश

(विवेक कुलकर्णी )आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय मिळवत गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली. करो किंवा मरो अशा स्वरूपाच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या दमदार शतकाच्या जोरावर गुजरातने राजस्थानचे आव्हान परतवून लावत जेतेपदाच्या लढतीत स्थान निश्चित (IPL Qualifier 2)केले.

चंदीगड येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थानची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाला, तर संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा ध्रुव जुरेलही स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे राजस्थानची अवस्था अडचणीत (IPL Qualifier 2)आली.

अशा परिस्थितीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने संयमी आणि प्रगल्भ खेळी करत डाव सावरण्याची जबाबदारी उचलली. त्याला बढती मिळालेला रवींद्र जडेजा दुसऱ्या बाजूने आक्रमक साथ देत होता. दोघांची भागीदारी रंगात आली असतानाच जडेजाला शारीरिक त्रास जाणवू लागला आणि त्याला मैदानाबाहेर जावे (IPL Qualifier 2)लागले.

त्यानंतर राजस्थानला आणखी धक्के बसले. कर्णधार रियान पराग, दासून शनाका आणि जोफ्रा आर्चर झटपट बाद झाल्याने राजस्थानची अवस्था ५ बाद ११९ अशी झाली. मात्र जखमी असतानाही जडेजा पुन्हा मैदानात परतला आणि त्याने सूर्यवंशीसोबत डावाला आकार (IPL Qualifier 2)दिला.

सूर्यवंशीने आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीवर नियंत्रण ठेवत परिस्थितीनुरूप फलंदाजी केली. अवघ्या ३१ धावांवर असताना त्याने अर्धशतक पूर्ण केले, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक ठरले. मात्र संघासाठी ही खेळी अत्यंत मोलाची होती. योग्य वेळी संयम आणि परिपक्वता दाखवण्याची क्षमता त्याच्यात असल्याचे त्याने सिद्ध (IPL Qualifier 2)केले.

शतकाच्या उंबरठ्यावर असताना सूर्यवंशी दुर्दैवाने ९६ धावांवर बाद झाला. तरीही त्याच्या अप्रतिम खेळीमुळे राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली. जडेजा आणि फरेरा यांनीही उपयुक्त फटकेबाजी करत राजस्थानला २० षटकांत २१४ धावांची आव्हानात्मक मजल गाठून(IPL Qualifier 2) दिली.

२१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. दोघांनी अवघ्या १२ षटकांत १४७ धावांची सलामी भागीदारी रचत विजयाचा मजबूत पाया (IPL Qualifier 2)घातला.

साई सुदर्शनने अर्धशतक झळकावल्यानंतर तो दुर्दैवीरीत्या बाद झाला. मात्र कर्णधार शुभमन गिलने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत राजस्थानला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. अप्रतिम फटकेबाजी करत त्याने शानदार शतक पूर्ण केले आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून(IPL Qualifier 2) ठेवले.

गिल १०४ धावांवर बाद झाला तेव्हा विजय केवळ औपचारिकता उरली होती. त्यानंतर जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी शांतपणे फलंदाजी करत गुजरातला दणदणीत विजय मिळवून(IPL Qualifier 2) दिला.

या विजयासह गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला असून रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांची जेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध महामुकाबला रंगणार आहे. दोन बलाढ्य संघांमधील या अंतिम लढतीकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. शुभमन गिलचे नेतृत्व आणि विराट कोहलीच्या आरसीबीची विजेतेपदाची स्वप्ने यामुळे हा सामना आयपीएल हंगामातील सर्वात रोमांचक सामना ठरण्याची शक्यता(IPL Qualifier 2) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00