लखनऊ(विवेक कुलकर्णी ): इंडियन प्रीमियर लीग 2026 मधील महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा आपली दमदार छाप पाडत लखनऊ सुपर जायंट्सवर 40 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानची गुणतालिकेतील पकड अधिक मजबूत झाली, तर लखनऊचा सलग चौथा पराभव झाल्याने त्यांची पुढील वाटचाल अधिक बिकट बनली (Rajasthan Royals victory) आहे.
नाणेफेक जिंकून लखनऊने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय योग्य ठरल्याचे दिसले. राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाल्याने राजस्थानची अवस्था बिकट झाली होती. मात्र अशा कठीण प्रसंगी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने जबाबदारी स्वीकारत संयमी पण प्रभावी खेळी केली. जडेजाने नाबाद 43 धावा करत डाव (Rajasthan Royals victory )सावरला.
त्याला रियान पराग (20), यशस्वी जैस्वाल (22) आणि शिमरॉन हेटमायर (20) यांची उपयुक्त साथ लाभली. त्यामुळे राजस्थानला 20 षटकांत 159/6 अशी लढाऊ धावसंख्या उभारता आली. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असतानाही राजस्थानने स्पर्धात्मक लक्ष्य (Rajasthan Royals victory) उभे केले.
लखनऊकडून मोहसीन खानने प्रभावी गोलंदाजी करत 2 बळी घेतले. त्याला प्रिन्स यादव आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी 2 बळी घेत चांगली साथ (Rajasthan Royals victory) दिली.
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांनी निराशा केली. एडन मार्करम, ऋषभ पंत आणि आयुष बडोनी स्वस्तात बाद झाल्याने संघ दबावात आला. एका टोकाला मिचेल मार्शने झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या आशा दाखवल्या. मार्शने 55 धावांची शानदार खेळी करत हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली (Rajasthan Royals victory) नाही.
निकोलस पूरनने 22 धावा केल्या, पण बाकी फलंदाज अपयशी ठरले. परिणामी लखनऊचा डाव 119 धावांवर संपुष्टात(Rajasthan Royals victory) आला.
राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड ठेवली. जोफ्रा आर्चरने भेदक मारा करत 3 बळी घेतले. त्याला बर्गर आणि शर्माने प्रत्येकी 2 बळी घेत मोलाची साथ (Rajasthan Royals victory) दिली.
हा विजय राजस्थानसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला असून प्लेऑफच्या शर्यतीत त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. दुसरीकडे लखनऊसाठी आता प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असा बनला (Rajasthan Royals victory)आहे.
संक्षिप्त धावफलक :
राजस्थान रॉयल्स – 159/6 (20 षटके)
रवींद्र जडेजा नाबाद 43, यशस्वी जैस्वाल 22, रियान पराग 20, हेटमायर 20
मोहसीन खान 2, शमी 2, प्रिन्स यादव 2
लखनऊ सुपर जायंट्स – 119 सर्वबाद
मिचेल मार्श 55, निकोलस पूरन 22
जॉफ्रा आर्चर 3/27,जडेजा 1/22
अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनाविर म्हणून गौरवण्यात ale
जोफ्रा आर्चर 3, बर्गर 2, शर्मा 2
