Home क्रीडा IPL 2026 : पंजाबचा दमदार विजय; दिल्ली आणि लखनऊ स्पर्धेबाहेर, PBKS चे लक्ष आता राजस्थान-केकेआरच्या निकालांकडे

IPL 2026 : पंजाबचा दमदार विजय; दिल्ली आणि लखनऊ स्पर्धेबाहेर, PBKS चे लक्ष आता राजस्थान-केकेआरच्या निकालांकडे

PBKS vs LSG:IPL 2026 मध्ये पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 7 गड्यांनी पराभव करत प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या. श्रेयस अय्यरचे पहिले IPL शतक, प्रभसिमरनची शानदार खेळी; दिल्ली आणि लखनऊ स्पर्धेबाहेर.

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून शनिवारी (२३ मे) झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या करो या मरो सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ७ गड्यांनी दणदणीत विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा स्पर्धेतील प्रवास अधिकृतरीत्या संपुष्टात आला, तर पंजाबच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्सचेही प्लेऑफचे स्वप्न धुळीस (PBKS vs LSG)मिळाले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण स्वीकारलेल्या लखनऊ सुपर जायंट्सने दमदार फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १९६ धावांचा मजबूत टप्पा गाठला. जोश इंग्लिसने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत ४४ चेंडूत ७२ धावांची तुफानी खेळी साकारली. त्याला आयुष बडोनीने १८ चेंडूत ४३ धावांची झंझावाती साथ दिली. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर लखनऊने पंजाबसमोर १९७ धावांचे आव्हान उभे (PBKS vs LSG)केले.

मात्र, पंजाब किंग्सच्या फलंदाजांसमोर लखनऊची ही धावसंख्या अपुरीच ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. प्रभसिमरन सिंगने अवघ्या ३९ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने अवघ्या १८ षटकांत ७ गडी राखून सामना आपल्या नावावर (PBKS vs LSG)केला.

या महत्त्वपूर्ण विजयामुळे पंजाब किंग्सचे १४ सामन्यांत १५ गुण झाले असून त्यांनी प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र पंजाबचा पुढील प्रवास आता त्यांच्या स्वतःच्या हातात राहिलेला नाही. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या आगामी सामन्यांच्या निकालांवर पंजाबचे भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः राजस्थानने विजय मिळवला तर त्यांचे १६ गुण होतील आणि ते थेट चौथ्या स्थानावर(PBKS vs LSG) झेपावतील.

त्यामुळे आता पंजाब संघ, व्यवस्थापन आणि चाहत्यांच्या नजरा उर्वरित सामन्यांकडे लागल्या असून मैदानावरील कामगिरीनंतर आता नशिबाची साथ मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंजाब प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यात यशस्वी ठरला असला, तरी दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास अखेर निराशाजनकरीत्या संपला(PBKS vs LSG) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00