Home गुन्हे Dehuroad Ganrape Case :देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल; चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

Dehuroad Ganrape Case :देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल; चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

देहूरोड येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात शिवाजीनगर न्यायालयाचा मोठा निर्णय. पीडितेला धमकावून वारंवार अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :देहूरोड परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. शिवाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालात चौघांनाही ‘दुहेरी जन्मठेप’ (Dehuroad Ganrape Case) ठोठावली.

ही घटना २०२१ मध्ये देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. आरोपींनी संगनमत करून पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केले. अत्याचाराचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सतत दबाव आणण्यात येत होता. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास तिला मारहाण केली जात होती, तसेच तिच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात (Dehuroad Ganrape Case)होत्या.

या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७६(ड), ३७७ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला (Dehuroad Ganrape Case)होता.

तपासादरम्यान पोलिसांनी वैद्यकीय अहवाल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मजबूत पुरावे न्यायालयात सादर केले. तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांनी प्रभावी बाजू (Dehuroad Ganrape Case)मांडली.

न्यायालयाने दोषी ठरवलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत —
१) नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान
२) सुलतान ऊर्फ मुश्ताख सलिम सय्यद
३) रियाज ऊर्फ मन्नन जावेद खान
४) सोहेल शेरअली पिरझादे

या चौघांनाही गंभीर गुन्ह्यांबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात (Dehuroad Ganrape Case) आली.

या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी विशेष मेहनत घेतली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोउपनि डी. एस. शेळके तसेच अमृत निंबाळे, महिला पोलीस हवालदार आशा घाटे आणि सचिन पतुरे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका (Dehuroad Ganrape Case)बजावली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00