शिरूर कासार (अनंत कराड ) : दि. १० व ११ एप्रिल दरम्यान ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन शांतीवन येथील ‘बाबा आमटे साहित्य नगरी’त उत्साहात पार पडले. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात कवी विठ्ठल बीडकर मुख्य व्यासपीठावर बालाजी मदन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या काव्यसंमेलनाने रसिकांची मनं जिंकली. या बहारदार कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगरचे संचालक तथा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी (Marathwada Sahitya Sammelan) केले.
अध्यक्षीय भाषणात बालाजी इंगळे यांनी ‘इराण-अमेरिका युद्ध’ या कवितेद्वारे जागतिक अस्थिरतेवर भाष्य करताना, “१५३ शाळकरी मुलींचे
रक्त मिसळलेले हे पेट्रोल,
गाडीत भरून
कुठे चाललो आहोत आपण?” अशा ओळींमधून श्रोत्यांना अंतर्मुख केले.
नरसिंग इंगळे यांनी
“कोणा सांगू दुःख माझं,
कोण निवारील रं;
दगडावनी काळीज त्यांचं,
दगडावनी सरकारं…”
या ओळींतून शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या.
बालासाहेब झोडगे यांनी
“आषाढाच्या महिन्यात
आला हिरवा पाऊस;
माय गेली शेतात
खुरपाया पिकास…”
या कवितेतून कास्तकारांच्या जीवनातील आशा-निराशेचे वास्तव चित्र उभे केले.
प्रमोद माने यांनी
“ही प्लॉट पडलेली शेतं
सजून बसलीयत,
गिर्हाईकाची वाट बघत
एन.ए.चा टिळा लावून…”
या ओळींतून जमिनीच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य (Marathwada Sahitya Sammelan)केले.
हरीष हातवटे यांनी
“सजलेल्या शहरांचे
आत कुजलेले भाव;
ज्याला असते काळीज,
त्याला म्हणतात गाव…”
या कवितेद्वारे शहरीकरणावर नेमके भाष्य करत वाहवा (Marathwada Sahitya Sammelan) मिळवली.
सत्यप्रेम लगड, विष्णू सुरासे आणि दादासाहेब सादोळकर यांच्या वात्रटिकांनी संमेलनात विशेष रंगत आणली. बालाजी मुंढे (‘आभाळ ओझं’), सीमा गुंड (‘बाई अशीच असते’), निलिमा देशमुख (‘शब्द’), काशिनाथ बिराजदार (‘आई का दिसत नाही’), चंद्रशेखर मलकमपट्टे (‘पारध’), बाळासाहेब गर्कळ (‘अजितदादा’), राजेंद्र सगर (‘या स्वातंत्र्यात आमुच्या’), सौ. वृषाली पाटील (‘वेदना’), उषा भोसले (‘झुरत जाणारी माणसं’), महादेव गायकवाड (‘मायचा शोध’), मनोज खुटे (‘कुणब्याच्या पोरा’) आणि रंजना गायकवाड (‘बालपण खास’) यांच्या कवितांनीही रसिकांना मंत्रमुग्ध(Marathwada Sahitya Sammelan) केले.
कविसंमेलनाचा समारोप करताना अनंत कराड यांनी ‘केरसूनी’ या कवितेतून नव्या-जुन्या पिढीतील संघर्ष प्रभावीपणे उलगडला.
“मह्या नादी लागू नगंस,
येड्या मी हाय खानदानी;
शिंदाडी नाटी नेसले मी,
मेनकापडी चड्डी नाय तुह्यावानी…”
या ओळींनी टाळ्यांचा कडकडाट (Marathwada Sahitya Sammelan)मिळवला.
यावेळी बाळासाहेब नागरगोजे, द. ल. वारे, संगीता होळकर, सुरेश कायटे, जगन्नाथ कांबळे, सुधीर कांबळे, शिवाजी मरगीळ, शेखर गिरी, नागेश शेलार, गोविंद जाधव, महेंद्र खंडागळे, गणेश जाधव, अजय भराटे, बालाजी भागानगरे, अर्चना खोपडे, लक्ष्मण मलगीरवार, प्रभाकर शेळके, विद्या दिवटे, अलका सपकाळ, डॉ. रेखा ढगे, शिवनंदा माळी, सारिका बेद्रे, श्रीकृष्ण उबाळे, मनोज खुटे आदींनीही आपल्या दर्जेदार कविता सादर(Marathwada Sahitya Sammelan) केल्या.
कविसंमेलनाला संमेलनाध्यक्ष फ. म. शहाजिंदे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष आसाराम लोमटे, सहकार्यवाह गणेश मोहिते, डॉ. दिपाताई क्षीरसागर, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, स्वागताध्यक्ष तथा शांतीवन संचालक दिपककाका नागरगोजे, कावेरीताई नागरगोजे यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित(Marathwada Sahitya Sammelan) होते.
