Home माझं पिंपरी चिंचवड Mayar Ravi Landge :गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारत वेळेत पूर्ण करा : महापौर रवि लांडगे

Mayar Ravi Landge :गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारत वेळेत पूर्ण करा : महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. गुणवत्ता राखत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. १० एप्रिल २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार असल्याने कामाची गुणवत्ता अबाधित राखत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना (Mayar Ravi Landge) दिल्या.

 

चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरात उभारण्यात येत असलेल्या या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रकल्पाची प्रगती, कामांची गुणवत्ता आणि वेळापत्रक याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा(Mayar Ravi Landge) केली.

 

याप्रसंगी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य कुशाग्र कदम, तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, अनिल भालसाखळे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, बाळू लांडे आदी अधिकारी उपस्थित(Mayar Ravi Landge) होते.

 

महापौर लांडगे म्हणाले की, शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून उभारली जात असलेली ही इमारत नागरिकांसाठी एक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित सेवा केंद्र ठरणार आहे. विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली जलद व सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून, कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखणे आवश्यक (Mayar Ravi Landge)आहे.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेचे काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी नमूद (Mayar Ravi Landge)केले.

 

दरम्यान, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी इमारतीच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर (Mayar Ravi Landge)केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00