Home माझं पिंपरी चिंचवड Yogesh Soman Felicitation:महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचा दिलासा साहित्य संस्थेतर्फे सन्मान

Yogesh Soman Felicitation:महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचा दिलासा साहित्य संस्थेतर्फे सन्मान

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांचा पुण्यात दिलासा साहित्य संस्थेतर्फे सन्मान. ‘कनिक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि मान्यवरांची उपस्थिती.

by Admin
Spread the love

पुणे (सुरेश कंक )– महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल योगेश सोमण यांचा पिंपरी-चिंचवड येथील दिलासा साहित्य संस्थेच्या वतीने पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे यथोचित सन्मान करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. अशोक महाराज गोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे आणि अभंग गाथा प्रदान करून हा सन्मान करण्यात (Yogesh Soman Felicitation)आला.

 

या कार्यक्रमाचे निमित्त होते कवी प्रा. डॉ. नितीन करडेकर यांच्या “कनिक” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे आयोजन दिलासा साहित्य संस्थेने केले (Yogesh Soman Felicitation) होते.

 

यावेळी ज्येष्ठ कवयित्री व बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे, साम टीव्हीचे माजी व्यवस्थापक हनुमंत कुंभार, ज्येष्ठ चित्रकार रमेश नावडकर, दिलासा साहित्य संस्थेचे नारायण कुंभार, प्रकाशक सुनील उंब्रजकर, राधाबाई वाघमारे, विजय शेंडगे, अर्जुन चौधरी, मुरलीधर दळवी, विलास कुंभार, अंबादास रोडे, प्रकाशक अनिल शिंदे आणि विनिता दापोरकर आदी मान्यवर उपस्थित (Yogesh Soman Felicitation) होते.

 

यावेळी दिलासा साहित्य संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अभंग तुकाराम” या चित्रपटात संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणारे योगेश सोमण यांची अध्यक्षपदी निवड झाली (Yogesh Soman Felicitation)आहे.

 

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगातील ओळींचा संदर्भ देत त्यांनी म्हटले – “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||”

या विचारांप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेने ‘अभंग’ स्वरूपाचे कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त (Yogesh Soman Felicitation)केली.

 

पुढे ते म्हणाले, “परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने नवीन कार्यकारिणी येत्या पाच वर्षांत उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास (Yogesh Soman Felicitation)आहे.”

 

यावेळी अध्यक्ष योगेश सोमण यांनीही “साहित्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र साहित्य परिषद सकारात्मक आणि परिणामकारक कार्य करेल,” असा मनोदय व्यक्त (Yogesh Soman Felicitation)केला.

 

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात (Yogesh Soman Felicitation)आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00