Home प्रेरणा / यशकथा Ekta Sahitya Sammelan:मूल्य व कौशल्याधिष्ठीत शिक्षण हा नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा – डॉ. योगेश सुरवसे

Ekta Sahitya Sammelan:मूल्य व कौशल्याधिष्ठीत शिक्षण हा नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा – डॉ. योगेश सुरवसे

एकता साहित्य संमेलनात शैक्षणिक धोरणावर परिसंवाद

by Admin
Spread the love

शिरूर कासार (वार्ताहर): देशाच्या एकूण बजेटमधील मोठा वाटा शिक्षणावर खर्च करणाऱ्या राष्ट्रांचा सर्वांगीण विकास जलद गतीने होतो, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), अंबाजोगाईचे अधिव्याख्याता डॉ. योगेश सुरवसे यांनी केले. आठव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण – बांधू मुलांच्या भविष्याचे तोरण’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत (Ekta Sahitya Sammelan) होते.

 

यावेळी संमेलनाध्यक्षा आमदार ॲड. उषाताई दराडे, एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड, प्रा. डॉ. भास्कर बडे, पत्रकार गोकुळ पवार, शिवलिंग परळकर, नितीन कैतके, राजेश बीडकर आदी मान्यवर उपस्थित(Ekta Sahitya Sammelan) होते.

डॉ. सुरवसे पुढे म्हणाले की, देशात स्वातंत्र्यानंतर केवळ तीन वेळाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले. ही प्रक्रिया दर दहा वर्षांनी झाली असती, तर आज शिक्षणव्यवस्थेचे चित्र अधिक प्रगत झाले असते. सर्वांना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असून ते प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पारंपरिक कारकूनी शिक्षणाऐवजी कौशल्याधिष्ठीत शिक्षण ही काळाची गरज ओळखून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद (Ekta Sahitya Sammelan)केले.

 

परिसंवादात प्रा. डॉ. अशोक घोळवे आणि डॉ. राजेश गोरे यांनीही सहभाग नोंदवला. डॉ. गोरे यांनी सांगितले की, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. नवीन धोरणात दिव्यांग विद्यार्थ्यांचाही विचार करण्यात आला असून केवळ गुणांपेक्षा विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि क्षमतांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. या धोरणाच्या यशासाठी पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी(Ekta Sahitya Sammelan) स्पष्ट केले.

 

प्रा. डॉ. अशोक घोळवे यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना सांगितले की, आजची शिक्षणपद्धती विसंगत स्वरूपाची झाली आहे. जिल्हा परिषद शाळा बंद करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे. इंग्रजांच्या काळात तयार झालेल्या कारकूनी शिक्षणपद्धतीचेच आपण आजही अनुसरण करत आहोत, त्यामुळे तरुणाई बेरोजगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे त्यांनी नमूद(Ekta Sahitya Sammelan) केले.

 

ग्रामीण भागातील पाडळी (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे एकता फाउंडेशनतर्फे आयोजित या संमेलनात शैक्षणिक विषयावर परिसंवाद घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणल्याबद्दल मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक (Ekta Sahitya Sammelan)केले.

 

या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच एकता फाउंडेशन आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित(Ekta Sahitya Sammelan) होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00