Home महाराष्ट्र Rupali Chakankar Resignation:रुपाली चाकणकर राजीनामा: अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

Rupali Chakankar Resignation:रुपाली चाकणकर राजीनामा: अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर वाढलेल्या दबावामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मोठा राजकीय निर्णय.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला (Rupali Chakankar Resignation) होता.

 

खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर हे प्रकरण गंभीर बनले. याच पार्श्वभूमीवर खरात आणि चाकणकर यांचे एकत्रित फोटो तसेच पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विविध राजकीय पक्ष, महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली (Rupali Chakankar Resignation)होती.

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे निर्देश दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपला राजीनामा अधिकृतरित्या सुपूर्द (Rupali Chakankar Resignation)केला.

 

राजीनामा पत्रात चाकणकर यांनी नमूद केले की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावर नियुक्ती झाली होती. वैयक्तिक कारणास्तव आपण स्वेच्छेने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच आजवर मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त(Rupali Chakankar Resignation) केले.

 

अशोक खरात प्रकरणामुळे केवळ गुन्हेगारी तपासच नव्हे, तर राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. महिला आयोगासारख्या संवेदनशील पदावरील व्यक्तीचा राजीनामा हा या प्रकरणातील सर्वात मोठा राजकीय परिणाम मानला जात (Rupali Chakankar Resignation)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00