Home पर्यटन Pune Traffic News:रमजान ईदनिमित्त निगडीमध्ये वाहतूक बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा

Pune Traffic News:रमजान ईदनिमित्त निगडीमध्ये वाहतूक बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरात २१ मार्च रोजी दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. प्रमुख रस्ते बंद राहणार असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यानुसार काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार (Pune Traffic News ) आहेत.

 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भक्ती-शक्ती चौक ते एमएसईबी माता मंदिर, चौपाटी चौक ते एमएसईबी माता मंदिर तसेच मोरया नगर ते चौपाटी चौक या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहणार(Pune Traffic News ) आहे.

 

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित मार्गावरील वाहने अंतर्गत रस्त्यांकडे वळविण्यात येणार आहेत. नागरिकांनी हनुमान मंदिर तसेच सेक्रेड हार्ट हॉस्पिटल मार्गाचा पर्याय म्हणून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले (Pune Traffic News )आहे.

 

ही विशेष वाहतूक व्यवस्था २१ मार्च रोजी दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. परिस्थितीनुसार वाहतुकीत आणखी बदल करण्यात येऊ शकतात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले (Pune Traffic News )आहे.

 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात (Pune Traffic News )आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00