पिंपरी (प्रतिनिधी ) – आजच्या प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्ट्या कार्यात आहेत, असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील ऑटोक्लस्टर सभागृहात गुरुवार (दि. १२ मार्च २०२६) रोजी आयोजित यशवंत–वेणू गौरव सोहळ्यात ते बोलत (Yashwantrao Chavan Pratishthan) होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी–चिंचवड विभागाच्या वतीने राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डॉ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत–वेणू पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे होते, तर नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती (Yashwantrao Chavan Pratishthan)होती.
यावेळी पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच नगरसेविका शिवानी नरळे यांना वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार, आर. के. डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे संचालक राजाराम मलघे यांना यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार आणि ब्राईट इंडस्ट्रीजचे संचालक वसंत गायकवाड यांना यशवंतराव चव्हाण उद्योगविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात(Yashwantrao Chavan Pratishthan) आले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांची भूमिका संविधानवादी होती. त्यांनी सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्षात आणला. सुसंस्कृत आणि आदर्श राजकारणी कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Pratishthan) होत.
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी ब्राह्मण–ब्राह्मणेतर वादावर समन्वयवादी भूमिका घेत सामाजिक क्रांती घडवून आणली. “कसेल त्याची जमीन” हा कायदा करून त्यांनी समानतेचा न्याय प्रस्थापित केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खरी ओळख जगासमोर (Yashwantrao Chavan Pratishthan) मांडली.
सुदाम भोरे यांनीही यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आजच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त(Yashwantrao Chavan Pratishthan) केले.
यशवंत–वेणू पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, तंत्रज्ञानाला मानवी मूल्यांची चौकट देणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. अनिता शिंदे यांनी मेहनत आणि प्रामाणिकपणाचा नेहमीच सन्मान होत असल्याची भावना व्यक्त केली. महापौर रवी लांडगे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व सागरासारखे विशाल असून त्यांचे कार्य हिमालयाएवढे महान असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त (Yashwantrao Chavan Pratishthan) केली.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने झाली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले तसेच पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव : इतिहासाचे एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान दिले. कुमार खोंद्रे यांनी ‘यशवंतगीत’ आणि ‘पिंपरी–चिंचवडची लावणी’ या काव्यरचना सादर (Yashwantrao Chavan Pratishthan) केल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनात अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, राजू जाधव, प्रतिमा काळे, प्रा. प्रभाकर दाभाडे आणि प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभाकर वाघोले यांनी आभार प्रदर्शन (Yashwantrao Chavan Pratishthan) केले.
