Home आरोग्य Women’s Day :चिंचवडमध्ये ब्रह्माकुमारीज संगीतमय योगतर्फे महिला दिन उत्साहात साजरा

Women’s Day :चिंचवडमध्ये ब्रह्माकुमारीज संगीतमय योगतर्फे महिला दिन उत्साहात साजरा

केशवनगर, सुखी भवन चिंचवड येथे ब्रह्माकुमारीज संगीतमय योग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ५० महिलांचा सहभाग, ध्यान सत्र, गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण सकारात्मक.

by Admin
Spread the love

केशवनगर, सुखी भवन, चिंचवड – दिनांक ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज संगीतमय योग यांच्या वतीने करण्यात आले (Women’s Day)  होते.

या उपक्रमात सुमारे ५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला नगरसेविका मनिषा चिंचवडे आणि अपर्णा डोके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त (Women’s Day) झाले.

कार्यक्रमात बी. के. ज्योती दीदी यांनी महिला दिनाचे महत्त्व, आत्मशक्ती, आत्मसन्मान तसेच समाजातील महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तसेच बी. के. आकांक्षा दीदी यांनी ध्यान (मेडिटेशन) सत्र घेतले. या सत्रामुळे महिलांमध्ये आत्मचिंतन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण(Women’s Day) झाला.

महिलांनी विविध गुणदर्शन सादरीकरणे, अध्यात्मिक परीक्षा आणि कला प्रदर्शनाद्वारे आपली कौशल्ये सादर केली. यावेळी मीना पोखरणा यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी विशेष लक्षवेधी (Women’s Day)ठरली .

संपूर्ण कार्यक्रम योग, ध्यान, संगीत आणि अध्यात्मिक उपक्रमांनी आनंदी व सकारात्मक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांनी व्यक्त केले की अशा उपक्रमांमुळे आत्मभान जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक(Women’s Day) होतो.

ब्रह्माकुमारीज संगीतमय योग सत्र दररोज सकाळी ६ ते ७ वाजता जिजाऊ गार्डन येथे निशुल्क घेतले जाते. दररोजच्या योग सत्रात सहभागी होण्यासाठी दीपक वाडेकर (मो. 9067319114) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात (Women’s Day)आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00