निगडी :निगडी येथील ज्येष्ठ नागरिक सौ. स्मिता नंदकुमार भगत यांचे दीर्घ आजाराने काल (दि. ३१ जानेवारी २०२६) दुःखद निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या व आजारपणामुळे अंथरुणाला खिळून (Sad Demise) होत्या.
सौ. स्मिता भगत स्वभावाने शांत, मितभाषी आणि कुटुंबवत्सल होत्या. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सकारात्मक सहभाग राहिला होता. त्यांच्या निधनामुळे भगत परिवारासह परिचित व मित्रपरिवारावर शोककळा पसरली (Sad Demise)आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात (Sad Demise) आले.

त्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथील पालक महासंघाचे अध्यक्ष सचिन भगत यांच्या मातोश्री (Sad Demise) होत.
त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व नागरिक स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत (Sad Demise) आहे.
