ही रॅली सकाळी ठीक 10.00 वाजता संत ज्ञानेश्वर चौक (भेळ चौक) येथून प्रारंभ झाली. त्यानंतर माल्हार हॉटेल, निगडी गावठाण परिसर, निलकंठेश्वर मंदिर, गांधी हॉस्पिटल, सिंधूनगर मंडळ, गजानन महाराज मंदिर, राम मंदिर, तुकाराम गार्डन, डी. वाय. पाटील कॉलेज परिसर, जय हिंद मित्र मंडळ, बुद्ध विहार आदी प्रमुख ठिकाणांवरून मार्गक्रमण करत प्राधिकरण, गंगानगर व आकुर्डी परिसरात रॅलीची सांगता (BjpVictory Rally)झाली.
या विजयी रॅलीत प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप पॅनलचे सर्व विजयी उमेदवार — राजू मिसाळ, शैलजा मोरे, शर्मिला बाबर आणि अमित गावडे हे सहभागी झाले होते. यांच्यासह परिसरातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (BjpVictory Rally )होते.
रॅलीदरम्यान भाजपचे झेंडे, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात संपूर्ण प्रभागात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या रॅलीतून मतदारांनी दिलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार विजयी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला. ही रॅली शांततेत, नियोजनबद्ध पद्धतीने व कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी (BjpVictory Rally)सांगितले.
ही विजयी रॅली भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप शैलजा अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली (BjpVictory Rally)होती.
