Home गुन्हे Pune Pimpri Dry Day:पुणे–पिंपरीत तीन दिवस ‘ड्राय डे; मतदानाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद

Pune Pimpri Dry Day:पुणे–पिंपरीत तीन दिवस ‘ड्राय डे; मतदानाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीपर्यंत तीन दिवसांचा ड्राय डे जाहीर. मद्यविक्री बंद, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी व मतदानासाठी विशेष व्यवस्था.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे मतदान मुक्त, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, बुधवारपासून ते निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच १६ जानेवारीपर्यंत शहरात कडक ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार आहे. यासोबतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कामगार विभागाने खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा दोन ते तीन तासांची सवलत देण्याचे आदेश दिले (Pune Pimpri Dry Day)आहेत.

मद्यविक्रीवर कडक निर्बंध

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मतदारांवर कोणत्याही प्रकारचे प्रलोभन टाकले जाऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने, परमिट रूम, बार तसेच देशी दारूची दुकाने आजपासून सलग तीन दिवस बंद राहणार (Pune Pimpri Dry Day)आहेत.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले की, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात (Pune Pimpri Dry Day) येईल.

भरपगारी सुट्टीचा आदेश; तक्रारीसाठी ई-मेल सुविधा

कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी पुणे विभागातील सर्व कारखाने, दुकाने व खासगी आस्थापनांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल, तेथे मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे आवश्यक(Pune Pimpri Dry Day )आहे.

जर कोणत्याही आस्थापनाने सुट्टी किंवा सवलत देण्यास नकार दिला, तर संबंधित कामगार थेट प्रशासनाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करू शकतात. यासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी जारी करण्यात आले (Pune Pimpri Dry Day)आहेत.

मतदान केंद्रांवर सूक्ष्म फवारणी व विशेष स्वच्छता

मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेपासून सुरू होणार आहे. वाढत्या धुळीचे प्रदूषण लक्षात घेता, महापालिकेने मतदान केंद्र परिसरात विशेष स्वच्छतेचे नियोजन केले आहे. मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार असून ‘मिस्ट मशीन’च्या माध्यमातून पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाणार आहे. यामुळे परिसरातील हवा शुद्ध राहण्यास मदत (Pune Pimpri Dry Day)होणार आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त व निवडणूक यंत्रणेने आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या (Pune Pimpri Dry Day)आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00