Home मनोरंजन Musical Night :नववर्षानिमित्त आयोजित चित्रपटगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Musical Night :नववर्षानिमित्त आयोजित चित्रपटगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरीतील निगडी प्राधिकरण येथे विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘बच के रहना रे बाबा…’ या हिंदी–मराठी चित्रपटगीतांच्या दृकश्राव्य मैफलीला नववर्षानिमित्त श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२६) :नववर्षानिमित्त विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘बच के रहना रे बाबा…’ या हिंदी–मराठी चित्रपटगीतांच्या सुमधुर, नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृहात गुरुवार, दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी ही खास सांगीतिक मैफल (Musical Night) पार पडली.

या मैफलीस राजू भिंगारे, सुनीता भिंगारे, साक्षी भिंगारे, सार्थक भिंगारे, अक्षदा यादव, वंदना यादव, मंदाकिनी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, प्रदीप गांधलीकर, मुकेश चौधरी, नेहा चौधरी, सुधाकर पाढळकर, विलास गाधडे, महीपत वर्पे, मोहन भस्मे, सानिका कांबळे, शुभम इगवे, साहिल कांबळे, राजेंद्र पगारे, नितीन यादव, डॉ. अशोक नगरकर, नीलिमा भिंगारे, सतीश भिंगारे, सुहास पालेकर, शैलजा पालेकर आणि सनी शर्मा यांची विशेष उपस्थिती (Musical Night)होती.

अतिथी गायिका ललिता जगदाळे यांच्यासह शुभांगी पवार, स्वाती भागवत, नेहा दंडवते, सुचिता शेटे–शर्मा, स्मिता उरणकर, शर्मिला डंबे, अरुण सरमाने, डॉ. किशोर वराडे, चंद्रकांत हिवरकर, सतीश गडचे, सुधाकर बाविस्कर, पिनाक भिंगारे, दिनेश कर्वे, अनिल जंगम, नंदकुमार कांबळे आणि विनायक कदम या गायक कलाकारांनी हिंदी–मराठी चित्रपटातील अजरामर गीतांचे प्रभावी सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध(Musical Night) केले.

प्रत्येक गीताच्या सादरीकरणासोबत त्या-त्या चित्रपटातील दृश्ये पार्श्वभूमीवरील पडद्यावर दाखवण्यात आल्याने श्रोत्यांना स्मरणरंजनाचा आनंद अनुभवता आला. मैफलीत ‘आँखों से जो उतरी…’, ‘आने से उसके…’, ‘ए सनम जिसने तुम्हे…’, ‘मेरे मेहबूब कयामत होगी…’, ‘किसीकी मुस्कराहटों पे…’, ‘प्यार माँगा है…’, ‘दिल में हो तुम…’ ही एकल गीतं तर ‘प्यार करने वाले…’, ‘दो कदम तुम भी…’, ‘फूल तुम्हें भेजा है…’, ‘दिल की ये आरजू थी…’, ‘कोरा कागज था…’, ‘वादा करले साजना…’, ‘दीवाना हुआ बादल…’, ‘आजकल तेरे मेरे…’, ‘जाने दो जाने दो…’, ‘इतना न तू मुझसे…’ या युगुलगीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद(Musical Night) दिली.

‘मैं हूँ झुमझुम झुमरू…’ या किशोरकुमार यांच्या योडलिंग गीताला वन्स मोअर मिळाला; तर ‘माळ्याच्या मळ्यामंदी…’, ‘मी तर भोळी अडाणी ठकू…’, ‘अश्विनी ये ना…’ या मराठमोळ्या गीतांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. शीर्षकगीत ‘बच के रहना रे बाबा…’ मुळे मैफलीत अधिक रंगत आली, तर ‘आए मेरे हाथों में…’ या बहारदार गीताने कार्यक्रमाचा कळस (Musical Night)साधला.

कार्यक्रमादरम्यान उषा शेटे आणि दिलीप तापकीर यांच्या हस्ते सर्व श्रोत्यांच्या वतीने नंदकुमार कांबळे यांचा सन्मान करण्यात(Musical Night) आला.

कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती; विनायक कदम यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी विशेष सहकार्य केले. राजेंद्र देसाई यांनी ध्वनिसंयोजन केले, विक्रम क्रिएशन यांनी दृकश्राव्य चित्रण केले, तर नागेश झळकी यांनी छायाचित्रण केले. कार्यक्रमाचे निवेदन सीमा गांधी यांनी( Musical Night)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00